• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देवघर येथील बँक कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

by Ganesh Dhanawade
June 14, 2024
in Guhagar
251 2
6
Online fraud of bank employee
493
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : बिटकॉईन व क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडत गुहागर देवघर येथील शाम शंकर पेवेकर या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याची एकूण ६६ हजार ३१७ इतक्या रक्कमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. Online fraud of bank employee

Distribution of Educational Material

दि. २८ फेब्रुवारी ते ७ जून २०२४ दरम्यान जितीन, थॉमस रॅनडेंनी या नावाच्या इसमांनी संगणकीय साधनांचा वापर करून इंटरनेट जनरेटेड क्रमांकाद्वारे पेवेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधत ते ब्रोकर असल्याचे भासवले. संभाषणातून पेवेकर यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्यांना बिटकॉईन व क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पेवेकर यांनी  चिपळूण येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १७ एप्रिल २०२४ रोजी १६,३७१ रुपये, तर ५ जून २०२४ रोजी फिरोज खान नामक व्यक्तीच्या खात्यावर ३ व्यवहाराद्वारे ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र यानंतर या व्यक्तींनी सर्व माध्यमातून संपर्क बंद केला. पेवेकर यांनी तशी फिर्याद गुहागर पोलीस ठाण्यात दिली. Online fraud of bank employee

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarOnline fraudOnline fraud of bank employeeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share197SendTweet123
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.