गुहागर, ता.19 : थोर साहित्यसम्राट, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, उपेक्षितांचे जीवन आपल्या लेखणीतून मांडणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने ऑनलाइन स्वरूपात साजरी करण्यात आली. Online awareness by teachers association


प्रथम संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुहास गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राची माहिती देऊन कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून स्पष्ट केला. यानंतर संघटनेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष कांबळे यांनी अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच गुहागर शाखा राबवीत असल्याबद्दल सर्व सभासदांना धन्यवाद दिले. Online awareness by teachers association
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संपदेवर थोडक्यात मनोगत व्यक्त केले. संघटनेचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राजेश गमरे यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक विकास मंदाकिनी पाथरीकर प्रदेशाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांचे बालपण तसेच परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात करावा लागलेला संघर्ष त्याचबरोबर, त्यांची ग्रंथसंपदा यामध्ये अण्णाभाऊंचे लेखन विषयक विविध पैलू स्पष्ट केले. यामध्ये कवी, गीतकार, वगनाट्यकार,लावणीकार, कादंबरीकार, कथाकार, नाटककार अशा विविध पैलूंची माहिती दिली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्यातील वैचारिक नाते तसेच अण्णाभाऊंना येथील समाज व्यवस्थेने दिलेली वागणूक याबाबत अत्यंत भावनाशील विचार व्यक्त केले. अण्णाभाऊंच्या साहित्याची आजही मोठ्या प्रमाणात छपाई होत असते पण याची रॉयल्टी अण्णाभाऊंच्या वारसांना मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. आजही या महापुरुषाच्या वारसांना हालाकीचे जीवन जगावे लागते आहे यासारखी मोठी शोकांतिका नाही. असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या महापुरुषांनी जाती नष्ट करून समाज जोडण्याचे कार्य केले,त्या महापुरुषांना आजही समाज जातीत अडकवत आहे. हे वास्तव आहे व ते योग्य नाही. यासाठी प्रबोधन करण्याची शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थी घडवत असताना त्याला योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण शिक्षकच घडवीत असतो आणि म्हणूनच समाजातील शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले. Online awareness by teachers association


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सचिव वैभवकुमार पवार, सभासद आशिष गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, दिपक चव्हाण यांचे सहकार्य लाभले. Online awareness by teachers association