• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अण्णा जाधव हल्ला प्रकरणी बदलापूर येथून एकाला ताब्यात

by Ganesh Dhanawade
May 12, 2025
in Guhagar
129 2
0
One arrested in Anna Jadhav attack case
254
SHARES
726
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : गुहागर विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर  गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारदार चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होतो. या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. या हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी मुंबई बदलापूर येथून गुन्हे अन्वेषण शाखेकडून  फरार असलेल्या संदीप पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.  One arrested in Anna Jadhav attack case

गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. अशा मध्येच हल्ला करण्याची पहिलीच घटना तालुक्यात घडली होती. विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघात हल्ला केल्याने या निवडणुकीला गालबोट लागला होता. गुहागर तालुक्यातील नरवण येथील हॉटेल सावली येथे विकास जाधव हे दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी पत्नी व आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा घेत होते. त्यांना फोन आल्याने ते उठून बाहेर गेले. याचवेळी दुचाकीस्वारावर दोघेजण पुढे येऊन एका उमेदवाराचं नाव घेऊन यांच्या विरोधात बोलतोस का असं बोलून धारदार शस्त्राने वार केला. पोटावर होणारा वार हात पुढे केल्याने हातावर निभावल्याने मोठ्या प्रमाणावर जखम झाली. तसेच त्यांच्या गाडीवर देखील दगड मारून नुकसान करण्यात आले होते. दरम्यान, हि घटना लक्षात येताच पत्नी आणि सहकारी बाहेर येताच मारेकरी दुचाकीने पसार झाले होते. जखमी जाधव यांच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीने उपचार करण्यात आले होते. One arrested in Anna Jadhav attack case

दरम्यान, गुहागर पोलिसांना या गुन्ह्यातील दोघांना काही महिन्यांपूर्वी मुंबईतून ताब्यात घेतले होते. तर फरार असलेल्या संदीप पवार याला बदलापूर येथून गुन्हे अन्वेषण शाखेकडून ताब्यात घेतले आहे. याप्रकारणी अधिकारी तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे करत आहेत. One arrested in Anna Jadhav attack case

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarOne arrested in Anna Jadhav attack caseUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.