रत्नागिरी ऐतिहासिक विठ्ठल मंदिर; नोंदणी अंतिम तारीख 20 मे 2023
रत्नागिरी, ता. 08 : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दि. २१ ते २८ मे २०२३ दरम्यान अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन केले आहे. यात जास्तीत जास्त विद्यार्थी व खुल्या गटासाठी नागरिकांनी भाग घेण्याचे आवाहन केले आहे. ही स्पर्धा बुधवार २४ मे रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरीतील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात होणार आहे. On the occasion of Savarkar Jayanti Elocution Competition

गट क्र. १ शालेय गट इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीसाठी आहे. या गटासाठी क्रांतिकारक – स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वा. सावरकरांचे बालपण, सावरकरांचे चरित्र हे विषय दिले आहेत. याकरिता कालावधी ५ + १ = ६ मिनिटे आहेत. विजेत्यांना बक्षिसे प्रथम क्रमांक रू. १५००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रू. १००० व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय ५०० रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. २५० रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. गट क्र. २ खुला गट असून महाविद्यालयीन व इतर सर्व व्यक्तींसाठी आहे. या गटासाठी सावरकर आणि आजचा भारत, स्वा. सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक सुधारणा आणि स्वा. सावरकरांचे हिंदुत्व हे विषय दिले आहेत. याकरिता कालावधी ६ + १ = ७ मिनिटे आहे. प्रथम क्रमांक रू.२०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रू. १५०० व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक १००० रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. ५०० रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. On the occasion of Savarkar Jayanti Elocution Competition
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपली नावे देण्याची अंतिम तारीख २० मे २०२३ पर्यंत आहे. स्पर्धकांनी आपली नावे संपर्क कमिटीकडे वेळेत द्यावीत. बक्षीस वितरण समारंभ २८ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. पतितपावन मंदिर, रत्नागिरी या ठिकाणी होईल. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क : गजानन करमरकर, मोबा. ९४२२०१०९३०२, भरत इदाते मोबा. ९७६४२३०३४३, सौरभ आठल्ये ९७३००२०१०७ On the occasion of Savarkar Jayanti Elocution Competition
