• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रोटरी स्कूलचा ओम जैन कोकण विभागात अव्वल

by Guhagar News
June 4, 2025
in Guhagar
148 2
0
Om of Rotary School topped the Konkan division
292
SHARES
833
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : माहे मे मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इ.12 वी विज्ञान शाखेच्या 15 विद्यार्थी जे.ई.ई. अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. ओम जैन याने दैदिप्यमान यश संपादित केले आहे. Om of Rotary School topped the Konkan division

Regal College Shringaratali Admissions Start

जे. ई. ई. ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. ओम जैन याने कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करून नामांकित आय. आय. टी. कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. कु. ओम याला वाचन, गायनाची असून तो प्रामाणिक, अभ्यासू, नम्र व हुशार मुलगा म्हणून शाळेमध्ये सर्वाना ओळखीचा आहे. सातत्य, नियमितता, सहजता, जिद्द, चिकाटी अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच कु. ओम जैन. एकदा ध्येय निश्चित केल्यावर न बोलता ते साध्य करण्यासाठी अपार परिश्रम करणे ही त्याची खासियतच. Om of Rotary School topped the Konkan division

Om of Rotary School topped the Konkan division

कु. ओम जैन याने रोटरी शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित केले आहे. त्याच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ओम जैन या विद्यार्थ्याला फिजिक्स विषय शिक्षक प्रा. राकेश स्वर्णकार, प्रा. कुलदीप गुप्ता, प्रा. प्रेमसागर सिंग, मॅथ्स् विषय शिक्षक प्रा. हुसेन मुबारक, प्रा विशाल सिंग, प्रा. सुनिलकुमार भारती, केमिस्ट्री विषय शिक्षक प्रा. अचितानंद झा, प्रा. जतीन गुप्ता तसेच वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. ओम जैन याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Om of Rotary School topped the Konkan division

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarOm of Rotary School topped the Konkan divisionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.