• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ व गुहागरमध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन

by Mayuresh Patnakar
January 15, 2023
in Guhagar
191 2
0
Olive Ridley Tortoise Conservation

गुहागर : यावर्षीच्या हंगामातील पहिली कासवाची पिल्ले समुद्रात सोडताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी

375
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित

गुहागर, ता. 15 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावरुन ऑलिव्ह रिडले जातीच्या 35 पिल्लांना तिन दिवसांत समुद्रात सोडण्यात आले. गुहागर तालुक्यातील गुहागर व तवसाळ या दोन गावात वन विभागाने ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन करण्याचे ठरविले आहे. 27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित केली आहेत. यावर्षी कासव महोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार वन विभाग करत आहे. Olive Ridley Tortoise Conservation

गेल्या काही वर्षात कासव संवर्धन करणारे शहर अशी गुहागरची ओळख बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास (ता. मंडणगड) पाठोपाठ गुहागर शहरातील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीची सर्वाधिक घरटी संरक्षित केली जातात. यावर्षी गुहागरमध्ये 23 नोव्हेंबरला पहिले घरटे मिळाले. आजपर्यंत गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर 25 घरट्यांमधुन 2 हजार 858 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. तवसाळ येथेही वन विभागातर्फे ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिम राबवली जाते. तेथे 2 घरट्यातून 240 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. Olive Ridley Tortoise Conservation

23 नोव्हेंबरला मिळालेल्या घरट्यात 123 अंडी होती. या घरट्यातून गेले दोन दिवस कासवाची पिल्ले बाहेर पडत आहेत. गुरुवार (ता. 12), शुक्रवार (ता. 13) व शनिवार (ता. 14) या तीन दिवसात सकाळी आणि संध्याकाळी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. आजपर्यंत एकूण 35 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. Olive Ridley Tortoise Conservation

आजपर्यंत मिळालेल्या घरट्यांची संख्या आणि वेळ लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक पिल्ले समुद्रात झेपावण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरुन फेब्रुवारी महिन्यात वन विभागामार्फत गुहागरमध्ये कासव महोत्सव करण्याची तयारी सुरु आहे. Olive Ridley Tortoise Conservation

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOlive Ridley Tortoise ConservationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.