• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालकमंत्री सामंत यांच्या आश्वासनाने उपोषण स्थगित

by Ganesh Dhanawade
October 4, 2022
in Ratnagiri
17 0
0
Ofroh's fast suspended
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ऑफ्रोहचे सात दिवसांपासून सुरूअसलेले आमरण उपोषण स्थगित

गुहागर, ता.04 : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या ऑर्गायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन (ऑफ्रोह) (Ofrah) महाराष्ट्र, शाखा रत्नागिरी (ऑफ्रोह) च्या आमरण उपोषणाच्या मंडपाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी भेट दिली. आपल्या संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ऑफ्रोहचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. Ofroh’s fast suspended

यावेळी ना. सामंत यांना संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदन दिल्याची आठवण करून दिली. ऑफ्रोह संघटनेच्या अधिसंख्य पदाच्या मागण्यांबाबत कॅबिनेट मिटिंगमध्ये लवकरात लवकर निर्णय घेणेबाबत ऑफ्रोहच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली. यावर ना. उदय सामंत यांनी सांगितले की, तुमच्या मागण्यांच्या निवेदनावर मी तात्काळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले. तसेच जर हा तुमचा प्रश्न सुटला नाही तर मी मुंबई येथे गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून स्वतः मुख्यमंत्री यांच्यासोबत आपल्या संघटनेसोबत स्वतंत्र मिटिंग घेऊन या विषयावरती निर्णय होईल. असा प्रयत्न करतो, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तरी आज शासनाचे मंत्री व पालकमंत्री म्हणून माझी उपोषणकर्त्यांना व पदाधिकारी यांना विनंती आहे की, त्यांनी आमरण उपोषण थांबवावे. ना. सामंत यांच्या विनंतीला मान देऊन सात दिवसांपासून सुरू असलेले हे आमरण उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी यावेळी सांगितले. Ofroh’s fast suspended

यावेळी ऑफ्रोहच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऊषा पारशे यांनी सामंत यांना पुष्पगुच्छ दिले. उपोषणकर्त्यांमध्ये गजेंद्र पौनीकर, नंदा राणे, विलास देशमुख, देवकीनंदन सपकाळे, शिला देशमुख, सुरेखा घावट, प्रियंका इंगळे यांचा समावेश होता. या आमरण उपोषणाच्या आंदोलनासाठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. उषा पारशे, ऑफ्रोहचे जिल्हा उपाध्यक्ष सिंधूताई सनगळे, सचिव बापुराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, सहसचिव सुनंदा देशमुख, पंडित सोनवणे, विलास घावट, अरुण बाविस्कर, बळीराम भगत, कमल वडाळ, लता वडाळ, हेमराज सोनकुसरे, दिलीप कडू, गजानन उमरेडकर, अर्चना उमरेडकर, राजेश सनगळे, राजकन्या भांडे, श्रीकृष्ण भांडे, विश्वास फुकट, प्रमोद सोनकुसरे, गजानन खडसे, नारायण गाजूलवार, विलास घावट, निकिता देशमुख, विलास खेडकर, बंडू चेचरे, वैश्नवी चेचरे, वनमाला भगत, सुनिता टापरे, प्रमिला घावट, वंदना चेचरे, मिना सोनवणे यांनी सहकार्य केले. Ofroh’s fast suspended

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOfrahOfroh's fast suspendedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.