गुहागर, ता. 17 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच महविकास आघाडीत सहभागी असलेले गुहागर मतदार संघाचे आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच नकार दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभा मतदार संघातील पक्ष संघटन पुन्हा नव्याने मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचे खा. सुनील तटकरे गुहागर दौऱ्यावर आले होते. Officials of Pawar group to welcome Tatkare
यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने तेही अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी तर अजित पवार गटातील आमदारांच्या भेटी घेतल्याचे समोर आले आहे. राज्यात शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेले. भाजप, शिंदे गटाच्या शिवसेने सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी सामील झाली आहे. महाविकास आघाडी सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदार, खासदार आणि राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गटाला अधिक पसंती दिली आहे. Officials of Pawar group to welcome Tatkare
गुहागर तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेहि अजित पवार गटासोबत राहिले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही जुने पदाधिकारी व कार्यकर्ते राहिले होते. अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतील घटक म्हणून आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नाराजी व्यक्त करत अजित पवार व भाजप मध्ये प्रवेश केला. दरम्यान, शरद पवार गटातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. त्यापैकी गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान तालुका सचिव प्रदीप बेंडल यांनी गुहागर दौऱ्यावर आलेल्या खा. सुनील तटकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले होते. त्यांची उपस्थिती पाहून हेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या आता चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण गुहागरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात खा. तटकरेंना भेटण्यासाठी उपस्थित होते. मात्र, सर्वांच्या पुढे येणे टाळत होते. येणाऱ्या निवडणुकीत कोण कुठे आहे, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. Officials of Pawar group to welcome Tatkare