गुहागरच्या किनाऱ्यावर कासविणीने घातली होती 120 अंडी
गुहागर, ता. 16 : उडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर टँगिंग केलेली मादी ऑलिव्ह रिडले कासवाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर 120 अंडी घातली होती. या अंड्यांपैकी 107 कासवाच्या पिल्लांचा समुद्री प्रवास सुरु झाला आहे. या घटनेमुळे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील कासवे स्थलांतर करतात हे संशोधनाने सिध्द केले आहे. त्याचा संदर्भ किनाऱ्यालगतचे तापमान, आद्रता आणि अन्नाची उपलब्ध आदी बाबींशी असु शकतो. असे मत कासवाच्या जीवनाचा अभ्यास करणाऱ्या निधी म्हात्रे यांनी म्हटले आहे. Odisha’s Turtle Lays 107 Hatchlings on Guhagar Beach
27 जानेवारी 2025 ला गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर टॅगिंग (टॅग क्रमांक 03233) केलेली मादी ऑलिव्ह रिडले अंडी देण्यासाठी आली होती. गस्तीवर असणाऱ्या कासवमित्रांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या मादीने घातलेली अंडी संवर्धित करताना तशी नोंद करुन ठेवली. तसेच ही गोष्ट अधिकाऱ्यांना सांगितली. त्यामधून शास्त्रज्ञ डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी या मादी कासवाला 18 मार्च 2021 मध्ये उडिशामधील गहिरमाथा किनाऱ्यावर टॅग केल्याची माहिती मिळाली. या मादी कासवाने दिलेल्या 120 अंड्यांमधील 107 अंड्यांमधुन पिल्ले जन्माला आली. या पिल्लांना गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरुन समुद्रात सोडण्यात आले. Odisha’s Turtle Lays 107 Hatchlings on Guhagar Beach


या घटनेमुळे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील कासवे हजारो कि.मी.चा प्रवास करतात हे सिध्द झाले आहे. गुहागरमध्ये अशाचप्रमाणे डॉ. सुरेशकुमार यांनी 5 कासवांना सॅटेलाईट टॅगींग केले होते. त्यातील बागेश्री या मादी कासवाने अवघ्या सहा महिन्यात श्रीलंकेला ओलांडून भारताची पूर्व किनारपट्टी गाठली होती. यावर्षी उडिसामधील कासवाने तब्बल 3500 कि.मी.चा प्रवास करत गुहागरचा समुद्रकिनारा गाठला. Odisha’s Turtle Lays 107 Hatchlings on Guhagar Beach
याबाबत बोलताना भारतीय वन्यजीव संस्थेतील कासवाच्या जीवनाचा अभ्यास करणारे संशोधक डॉ. सुरेशकुमार म्हणाले की, गहरीमाथा येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या तरुण मादीला 5 वर्षांपूर्वी टॅगिंग करण्यात आले होते. आज 5 वर्षांनी ही मादी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली. ही माहिती कासवांच्या मिलन व प्रजनन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची आहे. Odisha’s Turtle Lays 107 Hatchlings on Guhagar Beach