• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मागास प्रवर्गातील महिला होणार जि. प. अध्यक्ष

by Ganesh Dhanawade
October 2, 2022
in Ratnagiri
17 0
0
OBC Women will be next Z.P. President

रत्नागिरी-जिल्हा-परिषद

34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 02 : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिलेसाठी जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना चांगलाच हिरमोड झाला आहे. OBC Women will be next Z.P. President

राज्यात रत्नागिरीसह सातारा जिल्हा परिषदेचे महिला आरक्षण पडले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूकांचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. मागील ५ वर्षाच्या सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्यावेळी रत्नागिरीच्या स्नेहा सावंत आणि लांजाच्या स्वरूपा साळवी यांना प्रत्येकी सव्वा वर्षासाठी संधी मिळाली. तर पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारणसाठी होते. त्यावेळी शिवसेनेचे रोहन बने यांच्यानंतर सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादीचे विक्रांत जाधव हे अध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ओबीसी महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. OBC Women will be next Z.P. President

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOBC Women will be next Z.P. PresidentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.