तीन वर्षांसाठी नव्या कार्यकारणीची बिनविरोध निवड
गुहागर, ता. 20 : गुहागर तालुका रेशन दुकान मालक चालक संघटनेच्या अध्यक्षपदी वेळंब येथील बाळकृष्ण दत्तात्रय ओक यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 सदस्यांची नुतन कार्यकारिणी व 7 विभाग प्रमुखांची निवडही यांची निवडही झाली. संपूर्ण प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात, बिनविरोध पार पडल्याबद्दल संतोष देसाई यांनी सभासदांचे आभार मानले. Oak as President of Ration Shop Association

पाटपन्हाळेमधील ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये गुहागर तालुका रेशन दुकान मालक चालक संघटनेची वार्षिक जनरल सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतोष देसाई हे होते. या सभेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी नव्या कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण दत्तात्रय ओक (वेळंब), उपाध्यक्ष सौ. निकिता नितीन सुर्वे (अंजनवेल), सचिव सचिन शांताराम वळंजु (पिंपर), खजिनदार प्रशांत प्रदीप बेर्डे (भातगांव), सल्लागार संतोष केशव देसाई (वरवेली) व प्रकाश तानाजी आग्रे (मळण), सदस्य पदी स्नेहल नवनाथ लाड (धोपावे), केशव रामचंद्र तांबे (घाडेवाडी), नितेश रवींद्र विचारे (पोमेंडी), श्रीमती सिद्धी संतोष सावंत (जामसुत), नंदकुमार गुरव (चिंद्रावळे), सर्वेश रमाकांत साळवी (खोडदे), विश्वास विनायक खरे (पाचेरी सडा), मुबिन मोहीद्दिन पेवेकर (पेवे ) यांची निवड करण्यात आली. Oak as President of Ration Shop Association

त्याचप्रमाणे अंजनवेल विभाग प्रमुख म्हणून उर्वशी उदय धामणस्कर, पाटपन्हाळे विभाग प्रमुख उमर हुसैन लालू, पालशेत विभाग प्रमुख प्रकाश सिताराम झिंबर, हेदवी विभाग प्रमुख प्रकाश शांताराम गडदे, तवसाळ विभाग प्रमुख श्रावणी सुभाष रहाटे, भातगाव विभाग प्रमुख तुषार प्रविण हुमणे, पेवे विभाग प्रमुख म्हणून वसंत नारायण हुंबरे यांची निवड करण्यात आली. Oak as President of Ration Shop Association
मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण ओक म्हणाले की, समाजातील गोरगरीबांपर्यंत अन्नधान्य पोचविणे हे आपले काम आहे. यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून शासनाकडून वेगवेगळ्या व्यवस्था करण्याचा आग्रह केला जात आहे. आपण सर्वजण शासन आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहोत. आपल्याला येणाऱ्या अडचणी, शासनाच्या योजनांची अमंलबजावणी करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी, ग्राहकांच्या अडचणी, ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देण्यासाठी आवश्यक विषय आदी कामांसाठी रेशन दुकान चालक मालक संघटनेद्वारे सर्वांना विश्र्वासात घेवून, सर्वांचे सहकार्याने काम केले जाईल. Oak as President of Ration Shop Association
