मृत्यूचे प्रमाण शून्य, तळवली प्रा.आ. केंद्रात सर्वाधिक विंचूदंश रुग्ण
गुहागर, ता. 06 : तालुक्यात चालू वर्षात सुमारे 446 जणांना विंचूदंशाची लागण झाली असून 92 जणांना सर्पदंश लागण झाली तर 323 जणांना श्वानदंश झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगिड यांनी दिली. सुदैवाने वर्षभरात विविध प्रकारच्या कोणत्याही दंशामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याने वेळेत योग्य ते उपचार झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. Number of bite victims in Guhagar 861

ग्रामीण भागात साधारणता भातकापणी हंगामात विंचू व सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. साधारणतः ऑक्टोबर ते मे असा उन्हाचा हंगाम असल्याने या दरम्यान ग्रामीण भागात विंचूदंश प्रमाण वाढते असते. यावर्षी गुहागर तालुक्यात माहे एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत सर्प, विंचू, कुत्रा आणि इतर दंश आकडेवारी गुहागर तालुका आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या आकडेवारीनुसार तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात 9 जणांना सर्पदंश, 179 जणांना विंचूदंश, 65 जणांना श्वानदंश, हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात 21 जणांना सर्पदंश, 87 जणांना विंचूदंश, 61 जणांना श्वानदंश, 41 जणांना इतरदंश झाला आहे. कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 जणांना सर्पदंश, 7 जणांना विंचूदंश, 22 जणांना श्वानदंश तर 24 जणांना इतरदंश झाला. आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात 51 जणांना सर्पदंश, 114 जणांना विंचूदंश, 109 जणांना श्वानदंश, 85 जणांना इतरदंश झाला. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात 9 जणांना सर्पदंश, 59 जणांना विंचूदंश, 66 जणांना श्वानदंश, 17 जणांना मांजरदंश, एकाला माकड दंश तर 29 जणांना इतर दंश झाला आहे. Number of bite victims in Guhagar 861
सर्वाधिक विंचूदंश प्रमाण तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात असून कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात हे प्रमाण खूपच कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र सुदैवाने या वर्षभरात तालुक्यात विविध दंशामध्ये कोणताही मृत्यू झालेला नाही. ही बाब दिलासा देणारी आहे. Number of bite victims in Guhagar 861
