दि. 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत
रत्नागिरी, ता. 02 : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये यासाठी 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वा. पर्यंत रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जेल नाका – गोगटे कॉलेज-भाट्ये सागरी बीच पर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजुने नो पार्किंग झोन म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केली आहे. No parking zone
शुक्रवार 3 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा जिल्ह्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत दौरा कार्यक्रम होणार आहे. इतरही मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या दौरा कार्यक्रम दरम्यान वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, याकरिता अपर जिल्हादंडाधिकारी, यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार असलेल्या अधिकारान्वये 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वा. पर्यंत रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जेल नाका – गोगटे कॉलेज-भाट्ये सागरी बीच पर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजुने नो पार्किंग झोन म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे. No parking zone