नवी दिल्ली, ता. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधकांच्यावतीने खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासोबत दिलेल्या 50 खासदारांच्या सह्यांची पडताळणी केल्यानंतर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्विकारल्याचे संसदेत सांगितले. मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अन्यायाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देण्यास भाग पाडण्यासाठी हा अविश्र्वास प्रस्ताव दाखल करण्याची खेळी विरोधकांनी केली असल्याची चर्चा सध्या दिल्लीत सुरु आहे. (No Confidence Motion)
संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) सुरू झाल्यापासून मणिपूर (Manipur Violance) हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे पाच दिवसांत दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर बोलावे यासाठी विरोधक आग्रही आहेत. त्याचवेळी केंद्र सरकार अल्पकालीन चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांनी कामकाजात सहकार्य करावे. असे आवाहन सातत्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथसींग करत आहेत. मणिपूरचा मुद्दा देशांतर्गत असल्याने गृहमंत्री अमित शहा यावर उत्तर देतील. असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले. मात्र नियम 267 अन्वये सर्व कामकाज बाजुला ठेवून ही चर्चा घ्यावी. या मागणीवर काँग्रेस आदी विरोधी पक्ष ठाम आहेत. (No Confidence Motion)
दरम्यान संसेदेच्या अधिवेशनकाळात भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक मंगळवारी (ता. 25) दिल्लीत झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर सडकून टिका केली. ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स’ (I.N.D.I.A.) या आघाडीची तुलना त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी केली. त्यामुळे विरोधकांनी अविश्र्वास प्रस्ताव आणण्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. No Confidence Motion
26 जुलै रोजी सकाळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Leader of Opposition Mallikarjun Kharge) यांच्या दालनात सकाळी बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार लोकसभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी (एक तास आधी) खासदार गौरव गोगाई (MP Gaurav Gogai) यांनी लोकसभा सचिवालयात जाऊन केंद्र सरकारविरोधातील अविश्र्वास प्रस्ताव सादर केला. No Confidence Motion
इंडिया सोबत नसलेल्या तेलगंणामधील (CM, Telangana) चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे खासदार नम नागेश्वर राव यांनीही अविश्वास प्रस्ताव दिला होता. मात्र वेळ संपल्याने राव यांची नोटीस सचिवालयाने स्विकारली नाही. तरीही आमचा पक्ष अविश्र्वास प्रस्तावाच्या बाजुने असल्याचे खासदार राव यांनी सांगितले आहे. No Confidence Motion
सभागृह सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी खासदार गौरव गोगोई यांच्या प्रस्तावाला 50 खासदारांचा पाठिंबा असल्याची पडताळणी केल्यानंतर सरकारविरुद्धचा अविश्वास दाखल करून घेतला. आता सर्वांशी सल्लामसलत करून अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा दिवस आणि कालावधी निश्चित करण्यात येईल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले. नियमानुसार लोकसभाध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतल्यानंतर दहा दिवसांच्या आत त्यावर चर्चा होणे आवश्यक असते. त्यामुळे, या प्रस्तावावर आता पुढील आठवड्यात चर्चा होऊ शकते. विरोधकांच्या या अविश्वास प्रस्तावावर कायदामंत्री आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सरकार पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट केले. No Confidence Motion
लोकसभेतील पक्षीय बलाबल (संदर्भ – विकिपिडीया)
लोकसभेतील NDA चे खासदार : 332
भारतीय जनता पार्टी – 301
शिवसेना (शिंदे) – 13
राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (पशुपती कुमार पारस) – बिहार – 05
अपना दल (सोनिलाल) – उत्तर प्रदेश – 02
नॅशनल पीपल्स पार्टी – राष्ट्रीय पक्ष – 01
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) – महाराष्ट्र – 01
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) – बिहार – 01
नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टी – नागालँड – 01
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन – झारखंड – 01
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा – सिक्कीम – 01
मिझो नॅशनल फ्रंट – मिझोराम – 01
नागा पीपल्स फ्रंट – नागालँड – 01
अपक्ष – 3
विरोधक : (I.N.D.I.A.) सदस्य संख्या = 144
काँग्रेस – राष्ट्रीय पक्ष – 49
द्रविड मुनेत्र कळघम – तामिळनाडू 24
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस – पश्चिम बंगाल – 23
जनता दल (संयुक्त) – बिहार – 16
शिवसेना (उबाठा) – महाराष्ट्र – 06
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष {CPI(M)} – राष्ट्रीय पक्ष – 03
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) – महाराष्ट्र – 04
समाजवादी पक्ष – उत्तर प्रदेश – 03
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स – जम्मू काश्मीर – 03
इंडियन युनियन मुस्लीम लीग – केरळ – 03
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)- केरळ – 02
विदुतलाई चिरुतैगल कत्छी (VCK) – तामिळनाडू – 02
आम आदमी पक्ष – राष्ट्रीय पक्ष – 01
झारखंड मुक्ती मोर्चा – झारखंड – 01
केरळ काँग्रेस (M) – केरळ – 01
मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) – तामिळनाडू – 01
रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) – पश्चिम बंगाल – 01
कोंगुनाडू मक्कल देसिया कत्छी (KMDK) – तामिळनाडू – 01
अद्याप भूमिका जाहीर न केलेले प्रमुख पक्ष : 62
वायएसआर कांग्रेस पक्ष – आंध्र प्रदेश – 22
बिजू जनता दल – ओडिशा – 12
भारत राष्ट्र समिती – तेलंगण – 09
बहुजन समाज पार्टी – राष्ट्रीय पक्ष – 09
तेलुगू देसम पार्टी – आंध्र प्रदेश – 03
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलीमिन (AIMIM) – तेलंगण – 02
जनता दल (सेक्युलर) – कर्नाटक – 01
अन्य – 3
रिक्त जागा – 6