कुडलीतील रवींद्र निमकर यांचा शिवथरघळीत सत्कार
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कुडली जांभारी हे मुळ गाव असलेल्या रवींद्र निमकर यांचा दासबोधाची जननी असलेल्या शिवथरघळीत सत्कार करण्यात आला. 25 वर्षांपूर्वी शिवथरघळीतील कर्मयोगी मामा गांगल यांनी तळेगावात बाल संस्कार शिबिर घेण्याची सूचना केली. गुरूआज्ञा प्रमाण मानुन त्यांनी हे कार्य सुरू केले. आज 40 हून अधिक कार्यकर्त्यांची फळी बाल संस्कार वर्ग आणि समर्थ विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी उभी केली आहे. Nimkar felicitated in Shivtharghali

गुहागर तालुक्यातील कुडली जांभारी हे मुळ गाव असलेले रवींद्र निमकर सध्या पुणे जिल्ह्यातील तळेगांव इथे रहातात. शिक्षण संपल्यावर उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात असलेले निमकरकाका तळेगावात पोचले. तिथे वयाच्या 20 व्या वर्षी नोकरीला लागले. निमकर काका तळेगावात काही मंडळींना सोबत घेवून ग्रंथवाचन, पारायण, मुलांसाठी संस्कार वर्ग घ्यायचे. यापैकी काही मुलांना शिवथरघळीत होणाऱ्या बाल संस्कार शिबिरांना स्वखर्चाने घेवून जात असतं. 1996 च्या बाल संस्कार शिबिरात पु. मामा गांगल निमकर काकांना म्हणाले की, इतक्या दूरवरुन शिबीरासाठी स्वखर्चाने मुले आणण्यापेक्षा तळेगावातच तुम्ही शिबिर का घेत नाही. पु. गांगल यांचे हे बोलणे म्हणजे गुरुआज्ञा असे मानुन रवींद्र निमकर यांनी 1987 पासून तळेगाव परिसरात बाल संस्कार शिबिर सुरु केले. सुरवातीला जीथे मोफत किंवा कमी पैशात जागा मिळेल तिथे 2 ते 5 दिवसांचे शिबीर ते घेत असतं. कान्हा येथील सेवाधाम ट्रस्ट, भंडारा डोंगर आदी ठिकाणी हे शिबीर होत असे. पुढे देहु मधील गाथा मंदिरातील भक्तनिवासाची जागा शिबिरासाठी निश्चित करण्यात आली. 5 दिवसांच्या शिबिरातील प्रशिक्षण घेण्यासाठी, व्यवस्था पहाण्यासाठी तळेगावातील तरुणांची फळी उभी केली. आज 40 हुन अधिक कार्यकर्ते 50 मुलांचे शिबिर घेत आहेत. सुरवातीपासूनच शिबिराचा खर्च उभे करण्याची व्यवस्थाही निमकर काकांनी तळेगावातच उभी केली. त्यासाठी शिवसमर्थ प्रतिष्ठान ही संस्था निर्माण केली आहे. Nimkar felicitated in Shivtharghali

निमकरकाकांचे व्यक्तिगत जीवनही आदर्श घेण्यासारखे. त्यांनी निश्चिय करुन दिव्यांग मुलीशी विवाह केला. आपल्या भावांची शिक्षणे पूर्ण झाल्यावर 20 वर्षांनी वयाच्या 40 व्या वर्षी शासकीय नोकरी सोडली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी भोजनाचे डबे देण्याचा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय करताना देखील दररोज 1 डबा गरीबासाठी मोफत आणि 4 चपात्या श्वानांसाठी असे अन्नदान ते गेली 30 वर्ष करत आहेत. याशिवाय तळेगाव परिसरात अध्यात्मिक रुची असलेल्यांसाठी अभ्यासवर्ग, व्यायामशाळा, योग प्रशिक्षण, ध्यानधारणा असे अनेक उपक्रमांचे आयोजन रवींद्र निमकर मोफत करतात. Nimkar felicitated in Shivtharghali

केवळ पु. मामा गांगल यांची गुरुआज्ञा प्रमाण मानुन निमकर काकांनी सुरु केलेल्या या कार्याबद्दल सुंदरमठ सेवा समितीतर्फे शिवथरघळीत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मानचिन्ह आणि समर्थांचा प्रसाद देवून नांदेड मधील डॉ. विजय लाड यांनी गौरविले. यावेळी सुंदरमठ सेवा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तथा आबा चव्हाण निरा, कार्याध्यक्ष मुकुंद तथा नाना पाटणकर गुहागर, शिबीर समितीचे प्रमुख सुहास जावडेकर, डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा सौ. अलकाताई मुतालिक, आदी मान्यवरांसह सुमारे 250 समर्थभक्त उपस्थित होते. Nimkar felicitated in Shivtharghali
