भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी घेतला आ. जाधवांच्या टीकेचा समाचार
गुहागर, ता. 20 : आतापर्यंत विकासकामे करताना मी निधी दिला म्हणून बोंबलणारे आ. भास्कर जाधव यांना सदर पैसा जनतेचाच असल्याची उपरोती झाली आहे. पंतप्रधान मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत असून ब्राह्मण समाजाचाही अपमान करत आहेत. त्यांना आपला पराभव दिसू लागल्याने त्यांचा भाजप विरोधात थयथयाट सुरू झाला असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी आ. जाधवांच्या टिकेचा समाचार घेतला आहे. Nilesh Surve took notice of Jadhav’s criticism
भाजप गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. जाधव यांनी आमसभेतून तसेच गुढे फाटा येथे केलेल्या प्रत्येक वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी तालुका सरचिटणीस सचिन ओक, संगम मोरे, दिनेश बागकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. Nilesh Surve took notice of Jadhav’s criticism
मुंढर, पोमेंडी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी घाई करणारे हेच आ. जाधव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी आला नाही म्हणून जनतेला उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. जर जलजीवन योजनेचा बट्याबोळ झाला म्हणता तर आमदार म्हणून तुम्ही काय करत होतात. जलजीवन कामाच्या भूमिपूजनावेळी स्वताचे व स्वताच्या पुत्राचे फलक कशाला लावलात. रेशनकार्डला मिळणाऱ्या सर्व योजना शासनाच्या निकषाप्रमाणे असतात. यामुळे जो पात्र आहे, त्याला लाभ मिळणारच. रेशनदुकान देतो, तुम्ही आमच्या पक्षात या असे आपला एकही कार्यकर्ता बोलत नाही. जर चुकीचे असेल त तुम्ही कारवाई करून दाखवाच. Nilesh Surve took notice of Jadhav’s criticism
तुमच्या पुत्राच्या जिल्हा परिषद मतदार संघात एकदा फिरून विकासाचा किती बट्याबोळ झालाय ते पहा. एकाबाजुला निधी कमी पडू देणार नाही, असे म्हणतात. तर दुसऱ्याबाजुला निधी मिळत नाही म्हणून बोंबलतात. एमआयडीसीला स्थानिकांचा विरोध होता म्हणून ती रद्द झाली. पाच वर्षे तुम्ही मंत्री होता तेव्हा का नाही येथील उद्योग मार्गी लावलात. लाडकी बहीण योजनेवरही दुटप्पी भूमिका मांडतात. एकाबाजुला योजनेचे समर्थन करायचे. दुसऱ्याबाजुला उभाटाच्या अधिवेशनातून आपल्या पक्षनेत्याला घाबरून पथनाटय सादर करून टीका करायची, असा टोला लागवला. Nilesh Surve took notice of Jadhav’s criticism
विकास कामासाठीचा प्रत्येक नीधी हा जनतेचा आहे. मात्र हा जनतेचा निधी घरेलु कामगार म्हणून पैसे वाटताना तुम्हाला दिसला नाही का. यामुळे आरोप करताना मर्यादा ठेवा. आज ज्या पक्षनेतृत्वाबरोबर आहात. ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांची संपत्तीची चौकशी करण्याची मागणी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना करत होता. आदित्य ठाकरेंना वासरू, मेंढरू म्हणून बोलत होता. या अशा चिडचिडाट व थयथयाटपणा करून जनतेच्या नजरेतून तुम्ही उतरत चालले आहात. साठी बुद्धी नाटी, अंगामध्ये नाना कला दाखवून केवळ आपला पराभव दिसू लागल्याने भाजप विरोधात थयथयाट सुरू केला असल्याचेही निलेश सुर्वे यांनी सांगितले. Nilesh Surve took notice of Jadhav’s criticism