आ. जाधवांना करणार लक्ष; सभेपूर्वी गुहागरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गुहागर, ता. 16 : भाजपचे नेते निलेश राणे यांची आज शुक्रवारी (ता.१६) गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतमध्ये सायं. ४.३० वा. सभा होणार आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्व निर्माण झाले आहे. या सभेने राजकीय वातावरण तापणार असल्याने गुहागरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. Nilesh Rane today in Shringaratali
भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर भास्कर जाधव यांच्या विरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोटे येथे नुकताच राणेंचा दौरा झाला त्यावेळीही त्यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभांना आमदार जाधव यांनी हजेरी लावली आणि राणे कुटुंबीयांवर टीका केली. त्यानंतर राणे आणि जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भास्कर जाधव यांच्या विरोधात राणे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. Nilesh Rane today in Shringaratali
जाधव यांनी सिंधुदुर्गात जाऊन राणेंवर टीका केली, त्याची परतफेड निलेश राणे हे भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघात जाऊन करणार आहेत. राणेंकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाले आहेत. भास्कर जाधव मंत्री असताना त्यांचे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले कार्यालय राणे यांच्या कार्यकत्यांनी फोडले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये होणाऱ्या राणेंच्या सभेसाठी चिपळूण आणि गुहागरमध्ये पोलिस बंदोबस्त असणार आहे. Nilesh Rane today in Shringaratali
दरम्यान, आ. जाधव यांचे गुहागर मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे दुपारीच चिपळूण येथे दाखल होणार आहेत. या सभेला माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सुर्यकांत दळवी, भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रदेश, जिल्हा, तालुका आजी माजी पदाधिकारी, सदस्य तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. Nilesh Rane today in Shringaratali