गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पालशेत येथील निहाल महेश होळंब हा भारत संगीत कलापीठ सिंधुदुर्ग मधून पखवाज विशारद (प्रथमा) 76% A+ श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. 11 जानेवारी 2025 रोजी पंढरपूर वटवृक्ष स्वामी अक्कलकोट येथे 51 पखवाज वादकांसमवेत भक्ती सेवा वादनाचे भाग्य त्याला लाभले. त्याच्या या यशाचे तालुकावाशीय कौतूक करत आहेत. Nihal’s success in Pakhwaj playing


पालशेत येथे राहणारे महेश होळंब हे जिल्हातील सुप्रसिध्द भजनी बुवा आहेत. घरामध्ये सातत्याने भजनांचे सुर आणि पखवाजाचा नाद निहालच्या कानावर पडत होता. त्यामुळे त्याला लहानपणापासून तालवाद्य वाजवण्याची आवड होती. त्याचे वयाच्या सात वर्षापासून मिनार पाटील यांच्याकडे पखवाज शिक्षण सुरू झाले. गेले आठ महिने पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडे निहाल शास्त्रीय पखवाज शिक्षण घेत आहे. सावंत यांच्या चिपळूण येथील प्रशिक्षण वर्गाला तो दर गुरुवारी नित्यनेमाने जात होता. त्याप्रमाणे शिरीष नार्वेकर काळसे बगवाडी तालुका कुडाळ यांचे मार्गदर्शन लाभले. Nihal’s success in Pakhwaj playing