गुहागर, ता. 22 : श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान फंड आयोजित महोत्सवात दुसऱ्या दिवशी स्वरनिहाली या संगीत कार्यक्रमात संगमेश्वरची निहाली अभय गद्रे हिने शास्त्रीय संगीताने आपल्या मधुर आवाजात सर्वाच प्रेक्षकाना मंत्र मुग्ध केले. Nihali’s vocals mesmerized everyone
निहाली ने गणपत विघ्नहरण, विष्णुमय जग,अबीर गुलाल, बाजे मुरलिया बाजे, मन मंदिरा- काळी, मी राधिका, वृंदावनी वेणू, राधाधर मधुमिलिंद- काळी , जय शंकरा गंगाधरा, वद जाऊ कुणाला शरण, सोहम हर डमरु बाजे, कानडा राजा पंढरीचा व अच्युता अनंता या शास्त्रीय गाण्याचा नजराणा पेश केला. संगमेश्वर ची निहाली अभय गद्रे संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. निहाली स्वर निहाली या कार्यक्रमासाठी हार्मोनियम साथ अमित विकास ओक चिपळूण, तबला साथ किरण श्रीकांत लिंगायत, कसबा संगमेश्वर निवेदक निहालीची आईचे दीप्ती अभय गद्रे यांनी केले तर आयोजन सुनील जोशी यांनी केले. Nihali’s vocals mesmerized everyone

निहालीने वयाच्या दहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. देवरुख येथील ललित कला अकॅडमीमध्ये सौ संगीता बापट यांच्याकडे शिक्षण घेतलं. रत्नागिरीची सामंत यांच्याकडे पुढील शिक्षण त्या घेतल. 2019 संगीत विशारद ही पदवी प्रथम प्राप्त केली. कोल्हापूर देवल क्लब येथे संगीत अलंकार झाली. Nihali’s vocals mesmerized everyone
