मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचा विश्वास
गुहागर, ता.10 : शेठ येऊ दे, नाहीतर भाई येऊ देत. २०२४ मध्ये गुहागरचा आमदार मनसेचाच होणार असल्याचा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण (MNS District President Jitendra Chavan) यांनी व्यक्त केला आहे. गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. Next MLA from Guhagar is MNS
मेळाव्यापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेत मनसेच्या कार्यकत्यानी शृंगारतळी बाजारपेठेतून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. शेकडो मनसे सैनिक यारॅली मध्ये सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर, बोरगावचे सरपंच सुनिल हळदणकर, गुरू पाटील, प्रशांत सावर्डेकर, उदय घाग, रमेश गांधी, अभिनव भुरण, डॉ. प्रदीप आठवले, समीर जोयशी, राहुल जाधव, तेजस पोफळे आदी उपस्थित होते. यावेळी गुहागर तालुका मनसेच्या वनीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव संतोष नलावडे, ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. Next MLA from Guhagar is MNS
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण म्हणाले की, गुहागर तालुक्यात मनसे पक्ष वाढण्यास काहीच अडचण नाही. येथील तालुकाध्यक्ष व तालुका संपर्क अध्यक्ष जोमाने मनसे पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील लोकप्रतिनिधी तालुक्यातील विविध प्रश्न, समस्यांवर विधिमंडळात बोलत नाहीत. त्याचाही जनतेने विचार केला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाचे वाटोळे करण्याचे काम फक्त शिवसेनेने केले. पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष अंतर्गत राजकारण बाजूला ठेऊन पक्ष हितासाठी काम करा. रत्नागिरी आजही मागास राहिला आहे. नागरी सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आज जनतेच्या प्रश्नावर मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. Next MLA from Guhagar is MNS
गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात मनसे कार्यकत्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्याला कार्यकत्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातही मनसे सैनिक असल्याचे पाहून आनंद झाला. गावागावात जल्लोषाने होणारे स्वागत पाहून एक दिवस नक्की या गुहागरवर मनसेचा झेंडा फडकेल यात शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला. काहीजण चुकीच्या गोष्टी पसरवून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पुढील काळात हा प्रकार चालु देणार नाही. मनसे सैनिकांनी प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. सुखासोबत दुःखातही सहभागी झाले पाहीजे. पुढील येणाऱ्या निवणुकीमध्ये ताकदीने रिंगणात उतरून राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया असे आवाहन त्यांनी केले. Next MLA from Guhagar is MNS