लायन्स क्लबची धुरा आता नवीन पदाधिकाऱ्यांकडे
गुहागर, ता. 04 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी या क्लबचा पदग्रहण सोहळा 4 जुलैला सायंकाळी मोडकाआगर येथे होणार आहे. या सोहळ्यात क्लब प्रेसिटेन्ड म्हणून मनिष खरे, सेक्रेटरी म्हणून सुधाकर कांबळे व ट्रेझरर म्हणून निखिल तांबट यांच्यासह नवीन पदाधिकारी शपथ घेतली. पुढील वर्षभर व्हिजन या संकल्पनेवर आधारीत काम करण्याचा मनोदय मनिष खरे यांनी व्यक्त केला आहे. New office bearers of Lions Club
दरवर्षी जुलैमध्ये लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा पदग्रहण सोहळा होतो. गेले वर्षभर सचिन मुसळे, शैलेन्द्र खातू व नितीन बेंडल यांच्या नेतृत्वात लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीने विविध उपक्रम राबविले. यावर्षी गुहागर वरचापाटमधील नारळ सुपारीचे व्यापारी व विविध संस्थांचे संचालक असलेले मनिष खरे हे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणार आहेत. गुहागर हायस्कुलचे याच वर्षी मे महिन्यात निवृत्त झालेले मुख्याध्यापक सुधाकर कांबळे हे सेक्रेटरी रहाणार आहेत. तर निखिल तांबट या युवा नेतृत्वाकडे खजिनदार पदाची धुरा येणार आहे. New office bearers of Lions Club
हा पदग्रहण सोहळा लायन्स क्लबच्या एमजेएफ लायन प्रांजल गुंजोटे आणि गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांच्या उपस्थित आज 4 जुलै रोजी सायंकाळी हॉटेल शांताई रिसॉर्ट येथे होणार आहे. New office bearers of Lions Club
दृष्टी (व्हिजन) या संकल्पनेवर आधारीत विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय या निमित्ताने नवे अध्यक्ष मनिष खरे यांनी गुहागर न्यूजजवळ बोलताना व्यक्त केला. त्याचप्रमाणे समाजात वैशिष्टपूर्ण कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही या पदग्रहण सोहळ्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. New office bearers of Lions Club
