एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस सुविधेचा शुभारंभ
गुहागर, ता. 09 : कोकण रेल्वेच्या मार्गावर चिपळूण स्थानकात प्रवाशांच्या सुविधेकरीता एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. चिपळूण चे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. New facility at Chiplun Railway Station
चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म वर हि सुविधा सुरू करण्यात आली आहे. या वातानुकूलित लाऊंच मध्ये विविध प्रकारच्या आरामदायी 23 सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीच्या अपडेट सह येथे वाय फाय सुविधा, कॅन्टीन, सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रसाधनगृह अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. क्यू आर कोड च्या माध्यमातून तिकिटाचे पैसे अदा करण्याची सुविधा हि चिपळूण स्थानकात आज पासून सुरू करण्यात आली. चिपळूण चे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फीत कापून, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत या सुविधां चा शुभारंभ करण्यात आला. New facility at Chiplun Railway Station
यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे, मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, नागरिक, कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पूर्वी चिपळूण स्थानकात एक नवी सुविधा प्रवाश्याकरीता सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. New facility at Chiplun Railway Station