चैतन्य धोपावकर अध्यक्ष तर सचिन म्हसकर सचिव
गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका सरपंच संघटनेची सभा मंगळवारी (ता. 10) पंचायत समिती सभागृहात झाली. या सभेमध्ये संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणून चैतन्य धोपावकर यांची निवड करण्यात आली. तर संघटनेच्या स्थापनेपासून सचिव म्हणून काम करणारे सचिन म्हसकर यांची फेरनिवड करण्यात आली. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी सरपंच संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. New Executive of Sarpanch Association
गुहागर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी एकत्र येत सरपंच संघटना सुरु केली आहे. या संघटनेमार्फत विविध शासकीय विभागांशी संपर्क साधला जातो. नव्या योजना एकमेकांपर्यंत पोचविल्या जातात. एकमेकांच्या अडचणी संघटनेद्वारे सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. या संघटनेचे अध्यक्ष पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार होते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संजय पवार पराभूत झाले. त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यात 23 ग्रामपंचायतींचे सरपंचही बदलले. त्यामुळे पुन्हा एकदा तालुका सरपंच संघटनेचे पदाधिकारी निश्चित करण्यासाठी सभा घेण्यात आली. मंगळवारी (ता. 10 जानेवारी) गुहागर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात सर्वानुमते सरपंच संघटनेची नवी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. New Executive of Sarpanch Association

नव्या कार्यकारीणीमध्ये सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य धोपावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी ग्रामपंचायत कुडलीच्या सरपंच सौ.चैतनी शेट्ये, सचिव पदी ग्रामपंचायत साखरी त्रिशूळचे सरपंच श्री.सचिन म्हसकर, सहसचिव पदी भातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुशांत मुंडेकर, खजिनदार जामसुत ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. महेश जामसुतकर, सह खजिनदार ग्रामपंचायत पालपेणेच्या सरपंच सौ. स्नेहल पालकर, संपर्क प्रमुख ग्रामपंचायत कोळवलीचे सरपंच श्री. संतोष सावरकर, सह संपर्कप्रमुख ग्रामपंचायत साखरी आगरच्या सरपंच सौ. दुर्वा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर मार्गदर्शक सदस्य म्हणून मळण ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नारायण गुरव, उमराठचे सरपंच श्री. जनार्दन आंबेकर, पांगरी तर्फे हवेलीचे सरपंच श्री. नुरमहमद शर्फूद्दीन दळवी, सडे जांभारीच्या सरपंच सौ. वनिता डिंगणकर, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, खामशेतचे सरपंच श्री. मंगेश सोलकर, पाटपन्हाळेचे सरपंच श्री. विजय तेलगडे, काजुर्लीचे सरपंच सौ. रुक्मिणी विठ्ठल सुवरे, नरवणचे सरपंच श्री. प्रविण वेल्हाळ यांची नियुक्ती करण्यात आली.गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांची भेट घेवून सर्व सरपंचांसोबत महावितरण, सार्वजनिक बांधकाम, वन आदी राज्य शासनांतर्गत येणाऱ्या कार्यविभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे या सभेत ठरविण्यात आले. New Executive of Sarpanch Association
