प्रशांत (राजू) जोशी
कोकणात कुठलाही प्रकल्प आला की, त्याला विरोध करणारी संघर्ष समिती आधी तयार होते. कसल्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता बाहेरची मंडळी कोकणात येऊन प्रकल्प म्हणजे कोकणचे सौंदर्य, फळफळावळ, मासेमारी नष्ट करणारा असल्याचे बिंबवतात. एन्रॉनपासून हे असेच चालू आहे. गुहागर, नाणारनंतर आता बारसूतही तेच होत आहे. कारखानदारीबाबत कोकणी जनतेच्या नकारात्मक मानसिकतेचा आढावा घेणारा व रिफायनरीबाबत वास्तव भूमिका मांडणारा विशेष लेख… Negativity
बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला विरोध होत आहे. कोकणात येणार्या प्रकल्पांना असा विरोध होत राहिला, नकारात्मकतेतून आपण बाहेर आलो नाही, तर कोकणचा कॅलिफोर्निया कसा होणार? Negativity
कोकणात कोणताही नवा प्रकल्प येऊ घातला की, त्याला ज्या वेगाने टोकाचा विरोध होतो, त्या तुलनेत सर्वसमावेशक व मोकळी चर्चा होण्याचे प्रमाण खूपच कमी असते व त्यामुळे नेमके वास्तव काय, हे त्या त्या भागातील सामान्यांना कळत नाही आणि सर्वच प्रकल्प नकारात्मकतेच्या वजनदार विचारांच्या तराजूत तोलले जातात व त्यांना सरसकट विरोध करीत हुसकावण्याची सवय कोकणवासियांच्या अंगी भिनत चालल्यासारखे दिसते. कुठल्याही प्रकल्पाला विरोध केला की, वर्तमानपत्रात मथळे बनतात. सोशल मीडियावर लगेच बातम्या व्हायरल होतात, हे चांगलेच माहिती असल्यामुळे व पटकन प्रसिध्दीला येण्यासाठी प्रकल्पांना विरोध करणार्या संघर्ष समित्या निर्माण होतात. बारसू रिफायनरीवरून सध्या तापलेले वातावरण हा त्यातलाच एक भाग आहे. रिफायनरी प्रकल्प विनाशकारी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून कोकणातील मासेमारी, आंबा व इतर पिकांना त्याची झळ पोहोचेल, असे स्थानिकांवर बिंबविले जाते व तसेच त्यांचे विचार बनतात. पण त्याचवेळी देशातील हा काही पहिलाच रिफायनरी प्रकल्प आहे. अशातला भाग नाही. भारतात ऑईल रिफायनरीचे जवळपास चोवीस प्रकल्प कार्यरत असून त्यापैकी तीन प्रकल्प हे खाजगी, तीन संयुक्तरित्या उभारण्यात आले असून इतर अठरा प्रकल्प हे सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. Negativity
देवाच्या कृपेने कोकणला सर्वाधिक ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. कुठलेही औद्योगिक प्रकल्प उभारल्यावर विशेषत: रासायनिक प्रकल्पामध्ये काही प्रमाणात विसर्ग हा असतोच. त्यामुळे रासायनिक प्रकल्पांसाठी समुद्र किनारा असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. रोजच्या जीवनात सर्वत्र केमिकल्सशी संदर्भातील गोष्टींचा वापर होत असतो, अगदी लाकूड पॉलिशपासून ते कपड्यांच्या निर्मितीपर्यंत केमिकलचा वापर करणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे. तसेच अन्न धान्य उगविण्यामध्ये आवश्यक असणार्या पेस्टीसाईडस्मध्येही केमिकल्सची गरज आहेच. काहीवेळा बियाणे बनविण्यासाठीही केमिकल्सची गरज असते. त्यामुळे समुद्र किनारी म्हणजेच कोकणात रासायनिक प्रकल्पांना विरोध करण्याऐवजी एमआयडीसीसारख्या सरकारी संस्थांकडून रासायनिक प्रकल्पांच्या रासायनिक विसर्गासाठी उत्तम नियंत्रण निभावणारी जागतिक दर्जाची यंत्रणा उभारणे अधिक महत्वाचे आहे. सध्याचे लोटे परशुराम, महाड, रोहा हे केमिकल्स झोन बदनाम झाल्यामुळे रासायनिक प्रकल्पांविषयी सामान्य कोकणवासियांमध्ये कमालीची नकारात्मकता वाढत आहे. Negativity
आमच्यादृष्टीने मुख्य करुन सरकारी यंत्रणेने कामचलाऊ पध्दतीने उभारलेली प्रदूषण नियंत्रण व्यवस्था कारणीभूत आहे. इन्फ्लूएंट ट्रीटमेंटसारखे (ईटीपी/सीईटीपी) प्रकल्प उभारताना केवळ टेंडरींग प्रोसेस व त्यातील बिलो अणि अबोव्ह’ याकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यासाठी आवश्यक असणार्या तांत्रिकतेवर भर दिला जात नाही. उदाहरणार्थ लोटे परशुराम औद्योगिक प्रकल्पांमध्ये मल्टीकेमिक्ल इन्फ्लूएंट डिस्चार्जसाठी सुयोग्य यंत्रणा उभारण्याऐवजी आवश्यकता नसणार्या टाक्या वाढवून केवळ कॅपॅसिटी वाढविण्यात आली. त्याची आवश्यकता नव्हती. तसेच एमआयडीसीची निर्मिती करताना इन्फ्लूएंट डिस्चार्जच्या लाईन्स या खाडी आणि नदीच्या दरम्यान सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच तिथे प्रदूषणामुळे मासेमारीवर परिणाम झाला आणि मग त्या खाडी किनार्यावरील गावांची मानसिकता बनली. त्याऐवजी एवढ्या मोठ्या औद्योगिक वसाहत निर्मितीमध्ये त्यावेळचे दहा ते बारा कोटी अधिकचे खर्च करुन ही डिस्चार्ज लाईन खोल समुद्रात टाकली असती, तर डायल्यूशन पॉईंट मोठा मिळाला असता व त्यामुळे मासेमारीवरही परिणाम झाला नसता. सर्वसाधारणपणे गुजरात व इतर ठिकाणी अशा औद्योगिक वसाहतींसाठी डिचार्ज लाईन या पंधरा ते साठ किलोमीटर खोल समुद्रात आहेत. अमेरिकेतील ह्युत्सन हे जगातील केमिकल हब आहे. इथे डिस्चार्ज लाईन मैलोनमैल समुद्रात खोलवर आहेत. Negativity
या संदर्भाने सरकारी अधिकार्यांशी चर्चा केली असता, एनआयओने नेमून दिलेल्या जागेवर सीईटीपीचे ट्रीटमेंट केलेले इन्फ्लूएंट सोडले आहे, असे सांगितले जाते व या विषयाची बोळवण केली जाते, हे आम्ही अनेक वर्षे ऐकत आहोत. याचा अर्थ गाड्या जोरात जाऊन अपघात होतील, त्यासाठी वाहतूक यंत्रणा उभारण्याऐवजी महामार्गच बांधायचे नाहीत, असे म्हणण्यासारखे आहे. आज असे प्रकल्प उभारताना इन्फ्लूएंट लाईन खोल समुद्रामध्ये सोडा व इंडस्ट्रिला एमपीसीबीच्या माध्यमातून कंट्रोल करणे आवश्यक आहे. एनआयओच्या कार्यालयाकडे इन्फ्लूएंट लाईन समुद्रात सोडण्याबाबतचा विचारले असता एनआयओ (नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी) आनंदाने परवानगी देईल. लोटे परशुराम, महाड यासारख्या प्रकल्पातून जेवढा कर सरकारला मिळतो, त्यापैकी एका वर्षाच्या दहा टक्के खर्च केला, तरी खोल समुद्रापर्यंत इन्फलूएंट लाईन नेता येईल. पण तसे न करता अधिकारी प्रदूषणावर परिसंवाद, चर्चासत्र, वसुंधरा अभियान यावरच चर्चा करण्याला महत्वाचे मानतात. कोकणवासियांची रासायनिक प्रकल्पांविषयी झालेली किंवा बनलेली नकारात्मक मानसिकतेला वरील सर्व कारणीभूत आहे. Negativity
वरील विषद केलेली व विषण्ण करणारी तांत्रिक बाजू वास्तवाला कारणीभूत आहे. वास्तविक पाहाता हा रिफायनरी प्रकल्प (Refinery Project) इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, सौदी अरामको अशा भारतातील नवरत्न व जागतिक दर्जाच्या कंपन्या उभारत आहेत. त्यामुळे यांची प्रदूषण नियंत्रणाची तांत्रिकता ही अत्यंत उच्च दर्जाची असेल असे समजायला हरकत नाही. कारण अशा कंपन्या जागतिक लवादालाही उत्तर देण्यास बांधिल असते. जामनगर येथील रिलायन्सच्या रिफायनरी आवारात आंब्याची यशस्वी लागवड करण्यात आली आहे, हे विशेष. Negativity
वास्तविक पाहाता रिफायनरीमध्ये टाकून देण्यासारखे, विसर्ग सोडण्यासाठी काहीच नसते. सर्वात शेवटचा घटक म्हणजे मळी. ही मळी म्हणजे डांबर असून त्यालाही मोठी बाजारपेठ आहे. तरीसुध्दा शास्त्रज्ञ आणि विचारवंतांच्या दृष्टीने रिफायनरीतून सामान्य तापमानापेक्षा पाच डिग्री जास्त तापमानाचे पाणी उसर्जित होईल, हे जास्त तापमानाचे पाणीही खोलवर समुद्रात नेल्यास नेईपर्यंत समुद्राच्या पाण्याच्या तापमानाचे होईल, परंतु अशा असंख्य तांत्रिक गोष्टींचा विचार करण्याऐवजी व त्याच्यात तांत्रिक बदल सुचविण्याऐवजी राजकीय अभिनिवेश आणून वातावरण नकारात्मक केले जात आहे. आमच्या कोकणातील आप्तस्वकियांनो लक्षात घ्या, आपण मुंबईच्या जवळ राहून समुद्र किनार्याचा दैवी ठेवा असूनही व कोकणातील लोकांची बुध्दिमत्ता जगात मान्य असूनही आपण इतकी वर्षे विकसनशिल का राहातो, विकसित कधी होणार आहोत, हा प्रश्नही स्वत:ला विचारा.
कुठेही चर्चासत्र सुरु झाले की, कायम कोकणात इलेक्ट्रॉनिक प्रकल्प आणा, फॉसकॉनसारखे प्रकल्प, वाहने तयार करण्याचे प्रकल्प आणा, अशा आशयाचे मुद्दे आळविले जातात. मग केमिकलसारख्या कंपन्या कुठे उभारणार? ज्याला समुद्र किनारा आवश्यक आहे. केमिकलचा वापर दैनंदिन जीवनात आहे, याचा विचार करा. कितीही अलिशान बंगला बांधला, तरी शौचालयाला ड्रेनेज सिस्टिम असते, तसेच रासायनिक प्रकल्पांना उत्तम ड्रेनेज सिस्टिम करण्यात यावी, यावर भर द्यायला हवा. गुजरातमध्ये दहेजसारख्या ठिकाणी प्रचंड मोठी रासायनिक औद्योगिक क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कोकणात लोटे परशुराम, महाड, रोहा या ठिकाणी नावारुपाला आलेल्या असंख्य रासायनिक औद्योगिक प्रकल्प त्यांच्या पुढील विस्तारासाठी गुजरातमधील दहेज येथे जात आहेत, ही वास्तविकता आहे, याला केंद्र किंवा राज्य सरकारपेक्षाही आपली नकारात्मक मानसिकता अधिक कारणीभूत आहे. Negativity
एचओसीपीपीएल (हिंदुस्थान ओमान पेट्रोकेमिकल) प्रकल्प गुहागरच्या मार्गताम्हाने-तवसाळ भागात येत असताना तिथे गुजराथी पर्यावरण रक्षक आले, मेधा पाटकर आल्या आणि आपल्या कोकणवासियांत हा प्रकल्प येणे म्हणजे तुमच्या गावावर रासायनिक बॉम्ब पडण्यासारखे आहे, अशा आशयाचे प्रबोधन केले आणि त्या भागात ‘रोगट श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी चांगली’, असे बोर्ड लागले व एचओसीपीपीएल हद्दपार केले. मला खात्री आहे, आजही त्या भागातील अनेक स्थानिकांना याबद्दल वाईट वाटत असेल, परंतु सकारात्मक स्वभावाचे लोक शांत असतात आणि नकारात्मक स्वभावाच्या लोकांमध्ये आवेग असतो. नेहमीच आवेगापुढे शांतता कमी पडते, तसेच काहीसे कोकणात नेहमी होते.
नाणारसारख्या ठिकाणी अशा प्रकल्पांना आमचा तांत्रिक विरोध होताच, देशाला अत्यंत कमी किंमतीची आवश्यक असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी जैतापूर या ठिकाणची निवडलेली जागा व नाणार रिफायनरी प्रकल्प यासाठी नियोजित केलेली जागा यामधील हवाई अंतर अत्यंत कमी होते, त्यामुळे आमचा विरोध होता. हे म्हणजे काडीपेटीचा कारखाना आणि फटाक्यांचा कारखाना जवळ उभारल्यासारखे होते. Negativity
नाणारमध्ये जमीन खरेदीवरुन जे आक्षेप झाले ते आता बारसूलाही होत आहेत. परप्रांतियांनी जमिनी विकत घेतल्या याचा राग करण्याऐवजी पुढच्यावेळी कोकणवासियांनी यापुढे जागा विकण्यासाठी आजुबाजूला येणारे प्रकल्प व विकासाचा अभ्यास करावा, मगच जमीन विक्रीचा निर्णय घ्यावा. आता रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जा आणि आमच्याकडे फॉसकॉनसारखे प्रकल्प आणा, असे मुद्दे मांडले जातात. इलेक्ट्रॉनिक, आयटी आणि कार निर्मिती प्रकल्पांसाठी कुशल मनुष्यबळ लागते. मनुष्यबळ हे लोकसंख्येच्या घनतेशी पूरक असते. परंतु दुर्दैवाने कोकणातील गावं ही अत्यंत कमी लोकसंख्या असलेली आहेत, त्यामुळे आधी गावांना शहरांमध्ये, शहरांना महानगरांमध्ये बदलले गेले पाहिजे, तर असे प्रकल्प आपोआप येतील. Negativity
रिफायनरीसारखे प्रकल्प संपूर्ण देशाचा सर्व्हे करुन स्ट्रॅटेजिक्स लोकेशनला उभारले जातात. कुठल्याही आपत्तीच्या काळी, युध्दाच्यावेळी देशाच्या कुठल्याही भागातून पेट्रोलियम पदार्थ मिळाले पाहिजते, तसेच देशातील सर्व जनतेला कमी कमी वाहतूक खार्चामध्ये हे पदार्थ मिळाले पहिजे, अशा असे अनेक मुद्दे लक्षात घेऊन स्ट्रॅटेजिक्स लोकेशन ठरविली जातात. त्यामुळे वेस्टर्न इंडियामध्ये रिफायनरी उभारण्याची गरज होती, त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये रिफायनरी उभारण्याचे सरकारने ठरविले. अशा आवश्यक प्रकल्पाला विरोध करणे हे कितपत देशहिताचे आहे? मुंबईतील चेंबूरमध्ये दोन रिफायनरी प्रकल्प आहेत, तिथली परिस्थिती बघा, असा मुद्दा उपस्थित केला जातो. कृपया, आपण या गोष्टींकडे पाहावे. काही दिवसांपूर्वी चेंबूर, माहूल या परिसरातील तीन हजार ते चार हजार रुपये स्केअर फूट असणारे जागेचे भाव आता पंधरा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. हे सर्व एकत्रित मुद्दे कोकणवासियांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. Negativity
या रिफायनरीसाठी पर्यावरणदृष्ट्या तांत्रिक मुद्दे तपासण्यासाठी आपण आपले सल्लागार, शास्त्रज्ञ आणि त्यासाठी लागणार्या इतर अनेक गोष्टी तपासण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल. आधी गुहागर, मग नाणारला विरोध होता, आता बारसूला विरोध होत आहे. गुहागरमधून प्रस्तावित रिफायनरीसारखा प्रकल्प परत गेल्यास परिसराचे झालेले नुकसान त्यावेळच्या विरोध करणार्या लोकांना आता उमगत असावे, असे वाटते. आज बारसूला विरोध असेल, तर आमची विनंती राहील, कोकणच्या बाहेर प्रकल्प न घालविण्यासाठी मार्गताम्हाने-तवसाळच्या दरम्यान अधिसूचित केलेली जमीन सरकारने संपादित करावी. त्याठिकाणी पाण्याची लाईन, पाण्याची टाक्या बांधलेल्या आहेत. कदाचित नाणार, बारसूपेक्षा संपादित करण्याजोगी जागा कमी असेल तर नवीन तंत्रज्ञानानुसार कमी जागेतही पूर्ण क्षमतेने रिफायनरी उभारता येऊ शकते. तरी सरकारने गुहागरचाही विचार करावा, असे अगत्याने वाटते. मला खात्री आहे, गुहागरमध्ये विरोध केल्यास सकारात्मक विचार करणारी लोक, नकारात्मक विचाराच्या लोकांना बाहेर पडून समजवतील. आता नकारात्मकता सकारात्मकतेमध्ये बदलेल अशी खात्री आहे. Negativity