गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील खड्डे तत्काळ भरून टाका
गुहागर, ता. 31 : गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पडलेले खड्डे तत्काळ भरून टाका, अन्यथा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी येत्या तीन ते चार दिवसात पडलेले खड्डे भरून टाकू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. NCP’s statement to Highway Department
गुहागर – विजापूर महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. मार्गाचे काम पहिल्यापासूनच वादात सापडले आहे. गुहागर ते मार्गताम्हाणे पर्यंत झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत कामे आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उंच सखल असल्यामुळे प्रवाशांना, वाहनचालकांना होत असणारा त्रास, मोडकाआगर पुलाजवळील जोड रस्त्याची स्थिती, शृंगारतळी हायस्कूल जवळील धोकादायक रोड, काजळी स्टॉप जवळील अपुर्ण आवश्यक पुल, चिखली येथील अर्धवट असणारे पुलाचे काँक्रिटीकरण, पाटपन्हाळे येथील निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण आणि रस्त्याच्या बाजूला आवश्यक असणाऱ्या पिकप शेड याबाबत संबंधित ठेकेदार व महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठोस काम होताना दिसत नाही. NCP’s statement to Highway Department
गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे अपघातही घडत आहेत. आगामी गणपती सण लक्षात घेता मार्गावर पडलेले खड्डे तत्काळ भरून टाकून प्रवासी व वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी गुहागर शहरात मोजणीसाठी आलेले महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्याम खूनेकर यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंदार कचरेकर, माजी उपनगराध्यक्ष नरेश पवार, श्रीधर बागकर, दिपक शिरधनकर उपस्थित होते. NCP’s statement to Highway Department