मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश
गुहागर, ता. 21 : राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत गुहागर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड, दापोली तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. NCP’s Sahdev Betkar joins Shiv Sena
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती, आणि गुहागर मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात आमदारकी निवडणूक लढवून पराभव पत्करला होता. बेटकर यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. NCP’s Sahdev Betkar joins Shiv Sena
सहदेव बेटकर हे कुणबी समाजाचे नेते असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा चांगला संपर्क आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगले काम आहे. त्यांच्या पाठीमागे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील लोक भक्कमपणे उभे आहेत. गुहागर विधानसभेच्या निवडणुकीत भास्कर जाधव यांच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत बेटकर यांना कमी कालावधीत ५२ हजार मते मिळाली होती. पराभूत झाल्यानंतर बेटकर यांनी गुहागरकडे पाठ फिरवली. आणि आता पुन्हा मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करून बेटकर यांच्याकडे जिल्ह्यातील ओबीसी समाजाची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. NCP’s Sahdev Betkar joins Shiv Sena
बेटकर लवकरच गुहागरचा दौरा करणार आहेत. गुहागर मधील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते यावेळी प्रवेश करणार आहेत. NCP’s Sahdev Betkar joins Shiv Sena