• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साहिल आरेकर यांच्याकडे युवकांचे नेतृत्त्व

by Mayuresh Patnakar
March 30, 2023
in Guhagar
193 2
2
NCP Youth Congress District President Sahil Arekar

NCP Youth Congress District President Sahil Arekar

379
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड

गुहागर, ता. 30 :  राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष पदी गुहागरमधील तरुण सामाजिक कार्यकर्ता साहिल आरेकर यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवस रिक्त असलेल्या या पदासाठी जिल्ह्यातील 5 जण इच्छुक होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी युवक काँग्रेस संघटनेत काम केलेल्या साहील आरेकर यांनी निवड केली.  NCP Youth Congress District President Sahil Arekar

गुहागरमधील स्थापत्य अभियंता ( Civil Engineer) असलेल्या साहील आरेकर यांनी तरुण वयातच सामाजिक काम, शैक्षणिक कामाला सुरवात केली. गुहागरचे माजी सभापती, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष लोकनेते स्व. सदानंद आरेकर यांच्या नावाने प्रतिष्ठान सुरु केले. या अराजकीय संस्थेद्वारे तालुक्यात अनेक उपक्रम राबविले. 2019 मध्ये गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवाला सुरवात केली. या युवा महोत्सवातून तालुक्यातील युवकांना व्यासपीठ मिळवून दिले. तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या युवकांना पुरस्कार देवून गौरवही केला. आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही कौशल्य विकास आधारीत शिक्षण संस्था चिपळूणमध्ये सुरु केली. या संस्थेमध्ये 12 प्रकारचे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. याशिवाय गुहागरमध्ये लहान मुलांसाठी कन्हैय्या प्ले स्कुल सुरु केले. या मुलांसाठी अभ्यासक्रम निश्चित करुन त्याची पाठ्यपुस्तके तयार करण्याचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग साहील आरेकर यांनी केला. कोरोना संकटकाळात गोरगरीब कुटुंबाना धान्य वाटप केलेच शिवाय तालुक्यात विविध ठिकाणी पहारा देणाऱ्या पोलीसांना मास्क वाटप, पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था उभी केली.  NCP Youth Congress District President Sahil Arekar

तरुण वयात असे विविधांगी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या साहिल आरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी साहिल प्रदीप आरेकर यांचे नाव बुधवारी (ता. 29)  जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणचे नेते खासदार श्री. सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), आमदार श्री. शेखर निकम (MLA Shekhar Nikam), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव (NCP District President Babaji Jadhav) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व युवक तालुकाध्यक्ष यांच्या शिफारशीने ही निवड झाली आहे. साहिल आरेकर यांच्या निवडीची घोषणा होताच जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.  NCP Youth Congress District President Sahil Arekar

Tags: Civil EngineerGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Shekhar NikamMP Sunil TatkareNCPNCP District President Babaji JadhavNCP Youth Congress District President Sahil ArekarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादीलोकल न्युजसाहील आरेकर
Share152SendTweet95
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.