श्रीधर बागकर ; कोणाला भेटायचे हा पक्षांतर्गत विषय
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्योजक किरण सामंत यांची भेट घेतली. मात्र या भेटीमुळे काहीजणांना पोटादुखी झाली. वास्तविक आम्ही कोणाला भेटायला जायचं, कोणाला नाही ही आमची पक्षांतर्गत बाब आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर यांनी सांगितले. NCP met Samant


गुहागर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक सध्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात सहभागी होत आहेत. या विषयाची सुत्रे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधु व उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांच्याकडे आहेत. सहाजिकच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश घेणारी मंडळी रत्नागिरीत त्यांच्या कार्यालयात जातात. चर्चा झाल्यानंतर समुह छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात. त्यावरून सर्वांना समजते की आज या मंडळींनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. NCP met Samant
पक्षप्रवेशाचे असे कार्यक्रम सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी भैय्या सामंत यांना भेटले. त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध झाले. त्यामुळे गुहागर तालुक्यात विविध चर्चा सुरू झाल्या. यांच्यामुळे आपल्या अस्तित्वावर गदा येईल अशी भिती वाटू लागली. त्यातून अफवांचे पेवे फुटले. NCP met Samant
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर यांनी सांगितले की, भैय्या.सामंत साहेब यांची भेट घेतली तर त्यावरून अनेक लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. विरोधक वेगवेगळ्या बातम्या सोडत आहेत. परंतु ती भेट राजकीय नव्हती. गुहागरमधील काही विकासकामे कशी होतील आणि आमच्या कार्यकर्त्यांचे काही शासकीय कामे होती ती करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी तात्काळ आमच्या कामांना न्याय सुद्धा दिला. तसेच आम्ही घेतलेली भेट ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुहागर मधील पदाधिकाऱ्यांना सांगून घेतली होती. ही भेट आम्ही लपूनछपून घेतली नव्हती, उघड उघड घेतली होती. तरीही कोणाच्या पोटात दुखत असेल तर नाईलाज आहे. कोणीही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. NCP met Samant