पोलीस विभागीय अधिकारी राजमाने यांचे आवाहन
गुहागर, ता. 11 : गणेशोत्सव संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. दि. १५ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवासंदर्भात गुहागर पोलीस स्थानकातर्फे शृंगारतळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पोलीस विभागीय अधिकारी राजमाने यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना पोलीस यंत्रणेकडून कायद्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले. Navratri Festival Mandals must follow the law


१५ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. तालुक्यातील ३३ नवरात्र उत्सव मंडळांना शासनाने दिलेले नियम व अटी यांचे पालन करा असे आदेश देण्यात आले. नवरात्र उत्सवाला कोठेही गालबोट लागता कामा नये, देवीवर असलेले सोन्याचे दागिने सुरक्षित कसे राहतील, यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक रहा, विसर्जन वेळी छोट्या हातगाड्यांचा वापर करावा, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय अधिकारी राजमाने यांनी सर्व मंडळांना दिल्या. Navratri Festival Mandals must follow the law
यावेळी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश शिंदे यांनी कोणत्याही मंडळाकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. मात्र दिलेल्या वेळेपेक्षा काही वेळ जास्त झाल्यास त्वरित कारवाई करू नये. आम्ही त्या मंडळास समज देवू असेही ते म्हणाले. यावेळी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक पवन कांबळे, उपसरपंच आसिम साल्हे, ॲड. संकेत साळवी, गौरव वेल्हाळ यांसह तालुक्यातील प्रत्येक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. Navratri Festival Mandals must follow the law