गुहागर, ता. 07 : गणपती देवस्थान आणि गुरव वाडी मित्र मंडळ याच्यावतीने करंजेश्वरी मंदीरात नवरात्रोत्सव नऊ दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये दि. 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. Navratri Festival at Karanjeshwari Temple

करंजेश्वरी नवरात्रोत्सवानिमित्त दि. 3 ऑक्टोबर रोजी बुवा अमोल देवकर आरे यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. दि. 4 ऑक्टोबर रोजी असगोली हूंबरवाडी येथील जाखडी नृत्य आणि स्थानिक गरबा. दि. 5 ऑक्टोबर रोजी जीवनश्री प्रतिष्ठान संतोष वरंडे यांचे भजन व गरबा हे कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडले. Navratri Festival at Karanjeshwari Temple

यावेळी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांक मधुमती देसाई, द्वितीय क्रमांक सुशीला गुरव, तृतीय क्रमांक संचिता पवार यांना मिळाला. फनी गेम्समध्ये संगीत खुर्ची लहान गट प्रथम क्रमांक उर्वी बावधनकर, द्वितीय क्रमांक रुद्रा बागकार यांनी प्राप्त केले. खुला गट महिला प्रथम क्रमांक शिल्पा गुरव, द्वितीय क्रमांक नेहा पालांडे यांनी प्राप्त केले. खुला गट पुरुष प्रथम क्रमांक मंगेश कदम, द्वितीय क्रमांक ओंकार गुरव यांनी प्राप्त केला. तसेच चमचा गोटी लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आरोही कदम, द्वितीय क्रमांक उर्वी कदम यांनी प्राप्त केला. Navratri Festival at Karanjeshwari Temple

नवरात्रोत्सवासाठी कल्पेश बागकार, अविनाश सांडिम, प्रथमेश कदम, प्रफूल कदम, विनोद कदम, अभिषेक कदम, विनायक जाधव, वेदांत कदम, प्रसाद गुरव, पुरुषोत्तम गुरव, अभिराज कदम, अर्णव गुरव, अर्चित गुरव, महेश घाडगे, रुपेश बागकार, विक्रम जाधव, ऋषभ खामकर, साहिल गुरव, आशिष कदम, ओंकार कदम, मंगेश कदम, विलास कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या नऊ दिवसात गुरव वाडी मित्र मंडळ तर्फे करंजेश्वरी नवरात्रात नऊ दिवस गुहागरची ग्रामदैवत व्याघ्रांबरी व कारंजाई मंदिरात आरती करण्यात आली. Navratri Festival at Karanjeshwari Temple


