• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 June 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ शाळेमध्ये नवोदयच्या विद्यार्थिनींनी दिले योगाचे धडे

by Ganesh Dhanawade
June 23, 2026
in Guhagar
44 1
0
Navodaya students gave yoga lessons
87
SHARES
249
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ नंबर १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जि प आदर्श शाळा तवसाळ नंबर १ च्या माजी विद्यार्थिनी कु. तनया निलेश गडदे व कु.शुभ्रा निलेश सुर्वे या दोघीनी उपस्थित सहकारी विद्यार्थ्यांना, पालकांना व ग्रामस्थांना योगासनांचे धडे दिले. Navodaya students gave yoga lessons

यावेळी तनया व शुभ्रा या दोघींनी योगासन म्हणजे काय ? योगाचे आपल्या संस्कृतीतील महत्त्व व भविष्यकाळातील योगासनांची आवश्यकता, देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी योगविद्येला मिळवून दिलेली जागतिक मान्यता याची माहिती देत “ताडासन, वृक्षासन, सूर्यनमस्कार, मत्स्यासन, भ्रामरी प्राणायाम, कपालभाती, सूर्यभेदन, चंद्रभेदन आदी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवत त्याचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी मुख्याध्यापक श्री खंडगावकर सर, सहशिक्षक श्री राठोड सर यांच्या मार्गदर्शनाने तवसाळ जिल्हा परिषद आदर्श शाळेची प्रगती दिवसेंदिवस उंचावत चाललेली आहे. या शाळेची माजी विद्यार्थिनी असणारी तनया निलेश सुर्वे हिने नवोदय विद्यालयामार्फत नुकतेच राजस्थानमध्ये जाऊन इयत्ता ९ वी चे शिक्षण पूर्ण करून ती पुन्हा राजापूर येथे हजर झाली आहे. आज या आंतरराष्ट्रीय योग दिनी नवोदय विद्यालयांमध्ये योगासनांचे धडे गिरवून परिपूर्ण झालेल्या तनया व शुभ्रा यांनी गावातील आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना योगासनांचे दिलेले धडे गावासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट ठरली आहे. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री निलेश सुर्वे, काताळे ग्रामपंचायत प्रशासक सौ प्रियांका सुर्वे, पालक ग्रामस्थ दीक्षा पारदळे आदीसह शाळेचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. Navodaya students gave yoga lessons

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNavodaya students gave yoga lessonsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.