• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणात यावर्षी ४९१ गावे व वाड्या संभाव्य दरडग्रस्त

by Guhagar News
May 18, 2023
in Bharat
92 1
0
Natural disaster threat to villages in Konkan
181
SHARES
517
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 18 : कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ४९१ गावे आणि वाड्या संभाव्य दरडग्रस्त असल्याची नोंद करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात एकही गाव संभाव्य दरडग्रस्त नसल्याचे समोर आले आहे. Natural disaster threat to villages in Konkan

दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत आपत्ती व्यवस्थापन विभाग आपत्ती निवारणासाठी सज्ज झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या साथीला पोलिस प्रशासनावर व्यापक जबाबदारी देण्यात आली आहे. दरडग्रस्त गावांमधील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्याबरोबर स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये रायगड जिल्ह्यात 211,  ठाणे जिल्ह्यात 49, रत्नागिरी जिल्ह्यात 211, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 गावे आणि वाड्या संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट आहेत. Natural disaster threat to villages in Konkan

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली की दरड कोसळण्याच्या घटना घडत आल्या आहेत. यंदा देखील दरड कोसळण्याच्या घटना मुंबई-गोवा महामार्गावर घडल्या आहेत. नुकतेच रायगडाच्या पायथ्याशी असणार्‍या बावले गावात जमिनीला भेगा पडल्या आहेत. यामुळे कोकणातील संभाव्य दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Natural disaster threat to villages in Konkan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi Newsnatural disasterNatural disaster threat to villages in KonkanNews in GuhagarUpdates of Guhagarआपत्ती व्यवस्थापन विभागगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यादरडग्रस्त गावेनैसर्गिक आपत्तीमराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.