आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी, ता. 05 : राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या रिक्त जागांसाठी आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु सेवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केली आहे. National Youth Volunteer Recruitment
प्रत्येक तालुक्यात 3 प्रमाणे एकूण जागा 27 आहेत. यासाठी अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे. किमान पदवी शिक्षण घेणारा / पदवीधर / पदव्युत्तर, वयोमर्यादा:- ०१ जानेवारी २०२५ रोजी 18 ते 29 वर्षे, मानधन : दर महा रु. 5 हजार असणार आहे. जास्तीत जास्त तीन महिने आणि किमान 15 दिवसाचा कालावधी असेल. उमेदवार ज्या तालुकासाठी अर्ज करत आहे त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी ह्यापूर्वी NYV ह्या पदावर काम केले आहे. त्यानी अर्ज करू नयेत. अर्जदार कुठेही नोकरी करत नसावा. ही पगाराची नोकरी नाही. National Youth Volunteer Recruitment
मुलाखतीचा दिनांक आणि वेळ ई-मेल आणि फोन च्या माध्यमातून कळविण्यात येईल. अर्ज कसा करावा, योजनेबद्दल सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज नेहरू युवा केंद्र संगठन च्या www.nyks.nic.in वेबसाईटवर दिली आहे. (लिंक : https://nyks.nic.in/nycapp/main.asp). अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी, घ.नं.719 ई, शंकेश्वरनगर, गांधी कंपाऊंड, आरोग्य मंदिर रत्नागिरी 415612, संपर्क:- 02352- 295804/9176093429/9403508131 येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी 10 ते सायं 5) संपर्क साधावा. National Youth Volunteer Recruitment