• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

by Ganesh Dhanawade
March 15, 2023
in Guhagar
56 1
0
National Science Day in KDB College
111
SHARES
316
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.15 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने “राष्ट्रीय विज्ञान दिवस” आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी Central seminar competition (PPT Presentation) ही स्पर्धा घेण्यात आली. National Science Day in KDB College

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचय व्हावा यासाठी या PPT Presentation स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेड कॉलेजचे भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमोल पाटील उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. पी.एस. सरपोतदार, IQAC Co-Ordinator जी.बी. सानप व तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. National Science Day in KDB College

या कार्यक्रमात विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्यांनी स्वतः तयार केलेले PPT Presentation उपस्थित मान्यवरांसमोर व विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या Presentation चे परिक्षण करून डॉ.अमोल पाटील यांनी उत्कृष्ट असे तीन क्रमांक काढले. यात प्रथम क्रमांक कु.प्राची कदम, द्वितीय क्रमांक कु. उझमा काझी व तृतीय क्रमांक कु.तंझीला मालगुंडकर या विद्यार्थ्यांनी मिळविला. या विद्यार्थीनीना प्रमुख पाहुणे डॉ.अमोल पाटील, जी.बी.सानप यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. National Science Day in KDB College

या कार्यक्रमाचे प्रा. शीतल मालवणकर यांनी पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच प्रास्ताविक प्रा.प्रमोद आगळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्यने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.साहिल गमरे याने केले. National Science Day in KDB College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Science Day in KDB CollegeNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet28
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.