गुहागर, ता. 22 : वेळणेश्वर येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माता व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य याविषयावर सरपंच चैतन्य धोपावकर यांनी मार्गदर्शन केले. National Nutrition Program at Velaneswar

या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. सरपंच चैतन्य धोपावकर यांनी लिंग संवेदन शीलता, लिंगभाव समानता, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, आहार, आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. National Nutrition Program at Velaneswar

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य नितीन पोळेकर, शिक्षक प्रतिनीधी साळवी मॅडम, पत्रकार उमेश शिदें, सर्व वेळणेश्वर अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनिस, सर्व माता पालक, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. शेवटी सर्वांचे आभार मानून व अल्पहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. National Nutrition Program at Velaneswar
