• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ॲड. सुशील अवेरे यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार

by Ganesh Dhanawade
June 18, 2023
in Guhagar
155 1
0
National_Navratna_Award_to_Sushil_Avere
304
SHARES
869
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कोकण विभागातून प्रदान

गुहागर, ता. 18 : वकीली व कर सल्लागार व्यवसायाबरोबरच अन्य क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील ॲड. सुशील अवेरे यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोकण विभागातून नुकताच पंढरपूर येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल श्री. अवेरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. National Navratna Award to Sushil Avere

गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी या गावचे सुपूत्र असलेले ॲड. सुशील अवेरे यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर एम.काँम., जीडीसी, एल.एल.बी. अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या. तालुक्यात उत्कृष्ट कर सल्लागार म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. सध्या ते शासकीय, निमशासकीय संस्थांना कर विषयक प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. या जोडीला सामाजिक कार्याची आवड म्हणून स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी करीअर, स्वयंरोजगार अशा पध्दतीचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत असतात. सामाजिक कार्यामुळे ॲड. अवेरे गुहागर तालुक्याप्रमाणे जिल्हास्तरीय विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य जीएसटी प्रक्टीशनर असोशिएशनचे सदस्य, रत्नागिरी कर सल्लागार असोशिएशनचे सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका कोषाध्यक्ष, गुहागर तालुका वकील संघाचे सचिव, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे कायदेशीर सल्लागार, गुहागर तालुका औद्योगिक बहु.ग्रामीण सह. संस्थेवर बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. National Navratna Award to Sushil Avere

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Navratna Award to Sushil AvereNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share122SendTweet76
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.