मुंबई विद्यापीठ उपपरिसरात 29 आणि 30 जुलै 22 रोजी
रत्नागिरी, ता. 23 : मुंबई विद्यापीठचे कल्याण उपपरिसर आणि रत्नागिरी उपपरिसर यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय विज्ञानाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या विषयांवर 29 आणि 30 जुलै रोजी दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषद आणि परिसंवादाचं आयोजन कऱण्यात आलं आहे. विज्ञान भारती आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती माहिती कल्याण ठाणे उपपरिसराचे संचालक डॉ अद्धवैत वैद्य यांनी दिली. National level research and seminars


या परिषदेसाठी रिसर्च पेपर व रिव्ह्यु आर्टीकल मागवण्यात आले आहेत. 800 ते 1000 शब्दात हे रिसर्च पेपर असणं आवश्यक असून मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे रिसर्च पेपर असणं अपेक्षित आहे. हे पेपर 27 जुलैपर्यंत हे रिसर्च पेपर : muakam-22@mu.ac.in या इमेल आयडीवर पाठवणे अपेक्षित आहे. यातील निवडक पेपरचं सादरीकरण या राष्ट्रीय ऑनलाई परिषदेत केले जाणार आहेत. स्वातंत्र्य लढ्याचा कालावधी 1857 ते 1947 दरम्यान शास्त्रज्ञांनी दाखविलेले नैपुण्य यापासून ते 2022 ते 2040 कालावधीत प्रस्तावित आत्मनिर्भर भारत या विषयावर परिषदेमध्ये संशोधन सादरीकरण व चर्चा होणार आहे. National level research and seminars
विज्ञानातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष असं परिसंवादाचे शीर्षक आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अशा अनेक आघाड्यांवर चालला होता. त्याला समांतर वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून भारत देशाने सक्षम होण्यासाठी मोठे नैपुण्य दाखविले. ७५ वर्षांपूर्वी भारताला परकीय राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्य व सक्षमता पुन्हा मिळवण्याचा संघर्ष आजही सुरू आहे. या सगळ्याची माहिती व्हावी यासाठी ह्या परिसंवादाचं आयोजन ठाणे आणि रत्नागिरी उपपरिसराने केला असल्याची माहिती उपपरिसराचे संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी दिली. या परिषद आणि परिसंवादाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी तसेच डॉ श्रीवारी चंद्रशेखर सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली हे उपस्थित राहणार आहेत. National level research and seminars
29 जुलै रोजी सकाळ सत्रात प्रा.रंजना अग्रवाल संचालक, CSIR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च, नवी दिल्ली ह्या ब्रिटीश राज आणि भारतावरील वैज्ञानिक वर्णभेद या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रा जयंती दत्ता उपसंचालक, UGC-मानव संसाधन विकास केंद्र, पंजाब विद्यापीठ, चंदीगड ह्या वैज्ञानिक राष्ट्रवादाचा उदय, श्री. विवेकानंद पै सचिव, विज्ञान भारती, कोची भारताच्या वैज्ञानिक-आर्थिक राष्ट्रवादाचा इतिहास, प्रा. व्ही. रामनाथन सहाय्यक प्राध्यापक – रसायनशास्त्र, भारतीय तंत्रज्ञान संस्था-बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी हे स्वावलंबनाची सुवासिक कथा: चंदनाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. National level research and seminars


३० जुलै रोजी दुसऱ्या सत्रात श्री. जयंत सहस्रबुद्धे राष्ट्रीय संघटन सचिव, विज्ञान भारती, नवी दिल्ली ह्या १८ व्या शतकातील भारताच्या वैज्ञानिक शोषणाचा इतिहास, प्रा.राजीव सिंग सहाय्यक प्राध्यापक – अजैविक रसायनशास्त्र, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली हे भारताचे क्रांतिकारक: वैज्ञानिक आणि स्वातंत्र्यसैनिक, आणि डॉ चैतन्य गिरी, स्पेस डोमेन सल्लागार, नवी दिल्ली विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली, मुत्सद्दी शास्त्रज्ञ: 1947 पूर्वी भारताच्या जागतिक बॅटनचे वाहक यांचे परिसंवाद होणार आहेत. प्रा.अनिल डी. सहस्रबुद्धे अध्यक्ष, AICTE, वसंतकुंज, नवी दिल्ली यांचं समारोपपर भाषण होणार आहे. तरी जास्तीत जास्त प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी या राष्ट्रीय परिषद आणि परिसंवादात सहभाग घ्यावा, अशी विनंती कल्याण उपपरिसराचे संचालक आणि रत्नागिरी उपपरिसराचे संचालक यांनी केली आहे. National level research and seminars