रत्नागिरी, ता. 25 : भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने दिल्ली येथे २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो महिला संघामध्ये रत्नागिरीच्या पायल पवार हिची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ स्पर्धेसाठी दिल्ली येथे रवाना होणार आहेत. National Kho-Kho Tournament
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव संदिप तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे के. के. एम. कॉलेज, मानवत जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर झाले. यामध्ये खेळाडूंनी कसून सराव केला असून ते अजिंक्यपद खेचून आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पायल पवार हिला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. National Kho-Kho Tournament


महाराष्ट्राचे संघ
पुरुष गट : प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे),अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुं. उपनगर), लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ (कर्णधार), सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशिव), शुभम जाधव (परभणी), वेदांत देसाई (मुंबई), प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक : पवन पाटील (परभणी) व्यवस्थापक :अनिल नलवाडे (परभणी).
महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे) गौरी शिंदे, संपदा मोरे (कर्णधार), ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली) मिताली बारसकर (मुं. उपनगर). प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे), व्यवस्थापिका : वैशाली सावंत (परभणी). National Kho-Kho Tournament