गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुंढर न.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून सर्व धर्म समभावचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेची दिंडी काढली. यामध्ये पर्यावरणाचा वसा घेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. National integration Dindi in Mundhar school
आषाढी एकादशी निमित्त राज्यातील अनेक दिंड्या पंढरपूर तीर्थ स्थानाकडे रवाना होत आहेत. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी भक्तजन उस्तुक आहेत. यातच गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुंढर नं १ या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेची दिंडी काढली. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचे उपस्थितीत ही दिंडी सकाळी जिल्हा परिषद शाळा मुंढर येथून मार्गस्थ झाली. विविध संतांचे अभंग गात व पारंपरिक वेशभूषा करीत ही दिंडी निघाली होती. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. टाळ मृदंगाच्या गजरात शिक्षक, पालक व विद्यार्थी मग्न झाले होते.डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन पर्यावरणाचा वसा घेण्याचे आवाहन विद्यार्थी देत होते. विविध अभंगांमध्ये विद्यार्थी रममाण झाले होते. गावातील पालक, ग्रामस्थ यांनीही उस्फुर्त सहभाग घेतला होता. एक भक्तिमय वातावरणात विद्यार्थी समाजाला पर्यावरण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होते. National integration Dindi in Mundhar school
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.दशरथ कदम, श्री.वैभवकुमार पवार, श्रीम.धनश्री पेठकर, श्रीम.रेश्मा राऊत यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सचिन चाळके, पालक सदस्य श्री.संतोष लांजेकर, प्रभाकर चव्हाण, पोलिस पाटील श्री.निलेश गमरे तसेच गावातील पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. National integration Dindi in Mundhar school