कोकणात प्रथमच होत असलेल्या सभेची जोरदार तयारी
गुहागर, ता. 26 : अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देश पातळीवरील सर्वात मोठी ग्राहक हितासाठी काम करणारी सेवाभावी संघटना आहे. या संघटनेची रत्नागिरी येथील माधवराव मुळ्ये भवन संघ कार्यालयामध्ये दि. 29 व 30 डिसेंबर रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा कोकण प्रांतात पहिल्यांदाच होत आहे. यासाठी देशभरातील 38 प्रांतातून सुमारे 50 कार्यकारिणी सदस्य व अन्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी सभेनिमित्ताने तालुका व जिल्हा पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. National executive meeting for the first time in Konkan
या बैठकीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नारायणभाई शहा, राष्ट्रीय सचिव श्री. अरुण देशपांडे, राष्ट्रीय संघटक श्री. दिनकर सबनीस हे उपस्थित राहणार आहेत. त्यांचे विविध राज्यातून आलेल्या कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन लाभणार असल्याचे राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी यांनी सांगितले. National executive meeting for the first time in Konkan

2024 मध्ये ग्राहक पंचायतीच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गाव तेथे ग्राहक पंचायत अशी ग्राहक चळवळ अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासंर्भात या बैठकीत देशभरातील नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती सौ. जोशी यांनी दिली. National executive meeting for the first time in Konkan

