• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रीय बाल पुरस्कार अर्ज करण्याचे आवाहन

by Guhagar News
May 31, 2024
in Maharashtra
96 0
0
188
SHARES
536
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 31 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार” साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यापूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. अधिक माहितीसाठी ०२३५२ – २२०४६१ या नंबर वर संपर्क साधावा. National Child Award

'Remove' Hoarding

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. अर्ज  (http://awards.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय ०५ पेक्षा आधिक व ३१ जुलै, २०२४ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/ जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. National Child Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNational Child AwardNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.