नरेंद्र वराडकर यांचे निधन
गुहागर, ता. 09 : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या अडीअडणींना धावून जाणारे आणि शहरातील प्रसिद्ध वेल्डर नरेंद्र दीनानाथ वराडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथे शुक्रवारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. Narendra Varadkar is No More
शहरातील खालचापाट येथील (सद्या राहणार वरचापाट) नरेंद्र उर्फ नरू दीनानाथ वराडकर (वय ५८) यांना दोन दिवसांपूर्वीच अस्वस्थ वाटू लागल्याने डेरवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. वराडकर यांना पत्नी, तीन मुली आहेत. वडील कै. दीनानाथ तलाठी होते. त्यांनी शृंगारतळी, वेळब, साखरपा, संगमेश्वर याठिकाणी सेवा बजावली होती. याभागात वास्तव्यास असताना नरेंद्र वराडकर यांनी असंख्य मित्र परिवार जोडला होता. शहरातील किंवा परिसरातील आजारी पडल्यास त्याला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे काम वराडकर करत असे. श्री दुर्गादेवी देवस्थान यांच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून असंख्य रुग्णांना रात्री अपरात्री घेऊन जाण्याचे काम देखील ते गेली अनेक वर्षे करत होते. Narendra Varadkar is No More


वराडकर कुटुंबाला हा तिसरा धक्का आहे. वर्षभरात त्यांची आई, पंधरा दिवसांपूर्वी भाचा वारला होता. आता नरेंद्र वराडकर यांच्या जाण्याने हा तिसरा धक्का आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला असून शहरातील सामाजिक कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत. वराडकर यांच्यावर शनिवारी सकाळी खालचापाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. Narendra Varadkar is No More