१३ ते २७ एप्रिलपर्यंत; २० हजार मतदारांशी संवाद साधणार; बाळ माने
रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधण्याकरिता आज १३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत पर्यंत नमो संवाद सभा घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये या सभा होणार असून यात मतदारांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे व्हिजन समजावून सांगितले जाणार आहे. साधारण ५६ सभांमध्ये १५ ते २० हजार मतदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार या सभा घेऊन भाजपाचे मतदान वाढवण्याकरिता प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी दिली. Namo dialogue meeting
दररोज किमान पाच बैठकांचे नियोजन केले आहे. सभांना मतदारांसमवेत भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा, तालुका पदाधिकारी, बूथ अध्यक्ष उपस्थित राहतील. प्रत्येक सभेत २०० ते ३०० मतदारांना निमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे व्हिजन काय आहे हे मतदारांना समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींचे काम, योजना, कर्तुत्व यावर भाषण होईल. सभा साधारण ४५ मिनिटे ते एक तासाच्या आहेत. यात ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. बाबा परुळेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. विलास पाटणे, माजी जिल्हाध्यक्ष अशोक मयेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, महिला आघाडी प्रदेश चिटणीस शिल्पा मराठे आदी पदाधिकारीसुद्धा या सभांना उपस्थित राहणार आहेत. Namo dialogue meeting
१३ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता खेडशी येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयात पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, पानवल, खेडशी, गयाळवाडी, डफळचोळवाडी येथील मतदारांची नमो संवाद सभा होईल. सायंकाळी ५ वाजता कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक संघात कुवारबाव परिसर, ६.३० वाजता नाचणे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात नाचणे, शांतीनगर, गुरुमळी, वाडेकरवाडी, आंबेशेत या भागांतील मतदारांची सभा होईल. मिरजोळे येथील यश फाउंडेशन क्रीडांगण रात्री ८ वाजता केळ्ये, मजगाव, शीळ, दांडेआडोम, मिरजोळे, फणसवळे, कोंड येथील मतदारांना निमंत्रित केले आहे. Namo dialogue meeting
रविवारी १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जाकादेवी येथील संजय काळे यांच्या सभागृहात ओरी, खालगाव, बोंड्ये, विल्ये, जाकादेवी, राई, ४.३० वाजता खंडाळा येथील सर्वसाक्षी हॉल येथील बैठकीत सैतवडे, जांभारी, चाफेरी, कांबळे लावगण, वाटद, कोळीसरे, सैतवडे, सत्कोंडीमधील मतदार उपस्थित राहतील. गणपतीपुळे येथील चिंतामणी हॉलमध्ये सायंकाळी ७ वाजता मालगुंड, गणपतीपुळे, भंडारवाडा, भंडारपुळे, रात्री ८.३० वाजता नांदिवडे येथील पटांगणावरील सभेत जयगड, नांदिवडे, संदखोल, कासारी येथील मतदारांशी संवाद साधण्यात येईल. Namo dialogue meeting
नमो संवाद सभा १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जाकिमिऱ्या ग्रामपंचायत सभागृहात होईल. यात भाटीमिऱ्या, जाकिमिऱ्या, सडामिऱ्या, सायंकाळी ५.३० वाजता शिरगाव येथील शिरगाव, आडी, झाडगाव हद्दीबाहेरील आणि सायंकाळी ७ वाजता बसणी येथील राधारमण सभागृहात बसणी, काळबादेवी, कासारवेली, साखरतर, पिरंदवणे गावातील मतदारांना संवाद साधला जाईल. रात्री ८.३० वाजता कोतवडे येथे घैसास सभागृहात जांभरूण, खरवते, वेतोशी, कोतवडे येथील मतदारांना निमंत्रित केले आहे. पुढील सभांचेही नियोजन करण्यात आले असून २७ एप्रिलपर्यंत या सभा होणार आहेत. जवळपास २० हजार मतदारांशी यातून संवाद साधला जाणार आहे, असे बाळासाहेब माने यांनी सांगितले. Namo dialogue meeting