ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागर
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर या वास्तूतील वाचन विभाग व बाल विभागाचा नामकरण सोहळा शुक्रवार दि. 22 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. तरी या नामकरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, अशी विनंती अध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर व संचालक, कर्मचारी वर्ग व सर्व सभासद यांच्याकडून करण्यात आली आहे. Naming Ceremony

सदर सोहळा मा.श्री. प्रकाशजी देशपांडे व मा.सौ. निला विवेक नातू यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मा.श्री. श्रीरामजी खरे, मा.श्री. प्रसादजी वैद्य, मा.श्री. अरूणजी इंगवले हे उपस्थित राहणार आहेत. तरी सदर नामकरण सोहळ्यासाठी सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, अशी विनंती अध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर व संचालक, कर्मचारी वर्ग व सर्व सभासद यांच्याकडून करण्यात आली आहे. Naming Ceremony
