निर्मल ग्रा. आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम; जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची उपस्थिती
आबलोली (संदेश कदम)
गुहागर, ता. 16 : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गणेश मंदिर दैवज्ञ आळी आबलोली येथे श्री गणेश देवस्थान ट्रस्ट दैवज्ञ आळी आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने माघी गणेशोत्सव जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने शासनाचा स्तुत्य उपक्रम “माझी वसुंधरा” ४.० सेल्फी पॉईंटचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्तीकिरण पुजार यांचे हस्ते करण्यात आले. My Vasundhara selfie point at Abaloli
यावेळी गटविकास अधिकारी श्री. तुकाराम जाधव, ग्रामीण पुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, विस्तार अधिकारी श्री. भांड, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामसेवक बी.बी. सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या सौ. पायल गोणबरे, पोलीस पाटील श्री. महेश भाटकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमेय आर्यमाने आदी उपस्थित होते. My Vasundhara selfie point at Abaloli
गणेश मंदिर दैवज्ञ आळी आबलोली येथे माघी गणेशोत्सव सोहळ्या निमित्त जि.प. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्तीकुमार पुजार यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर या मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश देवस्थान ट्रस्ट दैवज्ञ आळी आबलोलीचे अध्यक्ष किरण वैद्य, सचिव दिनेश शेट्ये, पोलिस पाटील श्री. महेश भाटकर, श्री. प्रमेय आर्यमाने, श्री. राजेंद्र कारेकर, श्री. नंदकुमार वैद्य, श्री. प्रदिप शंकर वैद्य, श्री. रविंद्र वैद्य, श्री. संतोष वैद्य, श्री. दिपक वैद्य, श्री. बाबू सुर्वे, श्री. पिंटू सुर्वे, श्री. समिर शिंदे, श्री. नंदू पागडे, योगेश भोसले आदी उपस्थित होते. My Vasundhara selfie point at Abaloli