• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कार्तिकोत्सवानिमित्त संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

by Mayuresh Patnakar
November 5, 2022
in Guhagar
18 0
0
Musical Theater Entry Competition

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान

35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर वरचापाट येथे 6 ते 10 नोव्हेंबर उत्सव

गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर पासून कार्तिकोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवामध्ये नर्मदा परिक्रमा या विषयावर प्रवचन आणि जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये परंपरने होणारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 6 नोव्हेंबरला रात्री 9.30 वा.  ह.भ.प. सुमंतबुवा भिडे यांचे किर्तन होणार आहे.  7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर असे तिन दिवस सायं. 5 ते 6 काका महाराज वाड यांचे नर्मदा परिक्रमा या विषयाची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 9 व 10 नोव्हेंबरला स्व. गोविंदराव पटवर्धन स्मृतीप्रित्यर्क्ष जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने संगीत नाट्यरसिकांना विविध नाट्यगीतांचे सादरीकरण पहाण्याची संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी कार्तिकोत्सवामधील व्याख्यान आणि संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांना उपस्थित राहावे. असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMusical Theater Entry CompetitionNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.