६२ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी विक्रम
गुहागर, ता. 29 : ६२ व्या महाराष्ट्र राज्य कृषी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुहागर तालुक्यातील वाघांबे येथील परस्पर सहाय्यक मंडळ व पारवे मुंबई या संस्थेच्या संगीत ‘’जय जय गौरीशंकर’’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने संगीत नाटकात हा विक्रम प्रस्थापित केला असून त्यांचे गुहागर तालुक्यातून कौतुक होत आहे.

या राज्य नाट्य स्पर्धेत गुहागरच्या संस्थेने २०२२ मध्ये संगीत ‘’सुवर्णतुला’’, २०२३ संगीत ‘’मंदारमाला’’ ही नाटके सादर केली होती. संपूर्ण तालुक्यातील कलाकारांचा सहभाग असलेल्या या संस्थेने संगीत नाटकात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत आम्ही ‘कलामंच गोवा’ या संस्थेच्या संगीत ‘संत कबीर’ या नाटकाला व्दितीय तर रत्नागिरी ‘खल्वायन’ या संस्थेच्या संगीत ‘अमृतवेल’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण भवरे यांनी केली आहे. Musical Theater Competition

या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल
दिग्दर्शक : प्रथम शिवानंद दाभोळकर, व्दितीय राम तांबे
नेपथ्य : प्रथम प्रदीप तेंडुलकर, व्दितीय, मनस्वी हरमलकर
संगीत ऑर्गन वादक : प्रथम हर्षद काटदरे, व्दितीय स्वानंद नेने
तबला वादक : प्रथम हेरंब जोगळेकर, व्दितीय अथर्व आठल्ये
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष : अनिकेत आपटे, अरुण कदम (नाटक संगीत घाशीराम कोतवाल)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्त्री : अनुष्का आपटे (नाटक संगीत लावणी भूलली अभंगमाला) समीक्षा मुकादम (नाटक संगीत जय जय गौरीशंकर) संगीत गायन रौप्यपदक पुरुष विशारद गुरव, प्रवीण शीलकर,
संगीत गायन रौप्यपदक स्त्री : शारदा शेटकर, सावनी शेवडे
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : करुणा पटवर्धन, देवश्री शहाणे, अक्षता जोशी, प्रान्वी गणपुले, अभिजीत केळकर, नितीन कोयलेकर, गुरुप्रसाद आचार्य, दशरथ नाईक, विश्वास पांगारकर
गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : वेदवती परांजपे, श्रीजी पडते, श्रद्धा जोशी, जानवी खडपकर, यशश्री जोशी, सूरज शेडगावकर, गिरीश जोशी, साईराज कोळवणकर, अनामय बापट, वज्रांग आफळे यांनी पारितोषिके मिळवली. Musical Theater Competition

कोल्हापूर येथे दि. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२४ या कालावधीत संगीत सूर्य केशवराज भोसले नाट्यगृहात अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय कुलकर्णी, अनिरुद्ध खरे, दीपक चहांडे, श्रीमती योजना पाटील व मंगेश नेहरे यांनी काम पाहिले. Musical Theater Competition
