कोपरी नारायण देवस्थानचे आयोजन; नाट्यसंस्थांना सहभागाचे आवाहन
गुहागर, ता. 10 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने या वर्षीच्या कार्तिकोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. तरी जिल्ह्यातील संगीत नाटके सादर करणाऱ्या कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर आणि स्पर्धाप्रमुख मनीष खरे यांनी केले आहे. Music Theater Entry Competitions

श्री देव कोपरी नारायणाचा कार्तिकोत्सवात 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संगीत नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ऑगर्न वादनाने स्वरतृप्त झालेल्या रंगभुमीवर सांगीतिक सेवा करण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हौशी रंगभुमीवरील कलाकारांसाठी ही स्पर्धा आहे. नाट्यप्रवेशामध्ये किमान २ कलाकार असेल पाहिजेत. संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा असल्याने 25 ते 35 मिनिटीच्या सादरी करणामध्ये साधारणपणे 40 टक्के संवाद व 60 टक्के गायन व्हावे. तबला, पेटी, ऑर्गन, सिंथेसायझर आदी वाद्यांचा प्रत्यक्ष सहभाग असला पाहिजे. पार्श्र्वसंगीतासाठी म्युझिक ट्रक वापरु नये. असे काही नियम स्पर्धेसाठी असतील.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाच्या संघाना रोख रक्कम आणि चषक, उत्कृष्ट गायक, गायिका यांना रोख रक्कम व चषक अशी बक्षिसे देण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धक संघाला निश्चित स्वरुपाचे मानधन देण्यात येणार आहे. Music Theater Entry Competitions

रत्नागिरी जिल्ह्यातील संगीत नाटक बसविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन श्री देव कोपरी नारायण देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास देवस्थानचे सेक्रेटरी मनीष खरे यांच्याशी संपर्क (मोबाईल क्र. 9422431708, 9545271708) साधावा. Music Theater Entry Competitions
