• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवी दिली म्हणून मित्राचा केला खून

by Mayuresh Patnakar
August 21, 2022
in Guhagar
21 0
0
Murder at Chikhali

Murder at Chikhali

41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिखलीतील घटना, आरोपीने दिली कबुली

गुहागर, ता. 21 : आईवरुन शिवी दिली म्हणून डोक्यात कुऱ्हाड मारुन सुनील आग्रेने मित्र अनंत तानु मांडवकर याचा शनिवारी सायंकाळी खून केला. रविवारी सकाळी चिखली मांडवकरवाडी परिसरातील एका पायवाटेवर अनंत मांडवकरचा मृतदेह सापडला. त्यानंतर अवघ्या दोन तासात गुहागर पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले. Murder at Chikhali

चिखली मांडवकरवाडी येथे रहाणारे अनंत तानू मांडवकर (वय 48) आणि सुनील महादेव आग्रे (वय 45) हे दोघे मित्र होते. शनिवारी (ता. 20) सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान अनंत आणि सुनील यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी अनंतने सुनीलला आईवरुन शिवीगाळ केली. त्याचा राग येवून सुनीलने अनंतच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यामध्ये अनंत जागीच ठार झाला. ते पाहून सुनील आपल्या घरात गेला. आपल्या हातून अनंताचा खून झालाय हे कळल्यावर रात्री उशिरा सुनीलने अनंतचा मृतदेह मांडवकरवाडीतील एका पायवाटेवर आणून टाकला. घरी येवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. Murder at Chikhali

रविवारी सकाळी काही ग्रामस्थांना पायवाटेवर पडलेला अनंताचा मृतदेह दिसला. तातडीने ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस पाटीलांना दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी ही गोष्ट गुहागर पोलीस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक  पवन कांबळे, राजेश धनावडे, वैभव चौगले, प्रतीक रहाटे, हनुमंत नलावडे, आनंदराव पवार, स्वप्नील शिवलकर, तडवी, गणेश कादवडकर, घोसाळकर, फुटक यांच्यासह घटनास्थळी पोचले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते यांनी पोलीसांच्या टीम करुन एकाचवेळी घटनास्थळ व घराची तपासणी करणे, ग्रामस्थांकडून माहिती घेणे आदी कामांना सुरवात केली.  Murder at Chikhali

चिखली मांडवकरवाडीतील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनंत आणि सुनील हे दोघेही तापट व भांडखोर स्वभावाचे होते. दोघांचे आपल्या कुटुंबाबरोबर, ग्रामस्थांबरोबर पटत नव्हते. चिखली मांडवकरवाडी येथे हे दोघेही स्वत:च्या घरात एकटे रहात होते. एकाच ठिकाणी कामाला जात असल्याने या दोघांची मैत्री होती. Murder at Chikhali

या पार्श्र्वभुमीवर पोलीसांनी आपले लक्ष सुनील आग्रेवर केंद्रीत केले. चौकशीच्या वेळी सुनील आग्रेने या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र सुनील आग्रेच्या घराची कसुन तपासणी केली असता घराचे दार, छत्री आणि पायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. घरामधील जमीन नुकतीच पुसून काढल्याचेही पोलीसांच्या निदर्शनास आले. याबाबत सुनील योग्य प्रकारे माहिती देवू शकला नाही. आपण दोषी असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले आहे. असे कळल्यावर सुनीलने खूनाची कबुली दिली. Murder at Chikhali

अवघ्या दोन तासात गुहागर पोलीसांनी खून्याला शोधुन काढले. सुनील महादेव आग्रे (वय 45) याला गुहागर पोलीसांनी भारतीय दंड संविधानाचे कलम 302 व 201 प्रमाणे अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करीत आहेत.   यापुर्वी तीन मुली, 4 बालकांसह बेपत्ता झालेल्या 2 महिलांचा शोधही गुहागर पोलीसांनी अवघ्या 12 तासांत लावला होता. पोलीसांच्या या संघटीत तपासकामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Murder at Chikhali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMurder at ChikhaliNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.