गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जि. प. शाळा मुंढर न. 1 येथे भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णं महोत्सव या आनंदमयी सोहळ्या निमित्त “घर घर तिरंगा” प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाच्या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणीही करण्यात आली. Mundhar school took out Prabhat Feri
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर गावचे सरपंच सुशील आग्रे, उपसरपंच सौ. प्रणिता रामाने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेश आग्रे, पोलीस पाटील श्री. निलेश गमरे व सर्व पालक वर्ग आणि गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी सरपंच आग्रे यांनी प्रभात फेरीच्यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. व मुलांना गोड खाऊ वाटप केले. शेवटी पुन्हा शाळेत येऊन प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. Mundhar school took out Prabhat Feri